Subodh Bhave: परदेशातही 'वीण दोघांतली ही तुटेना'; फॅमिली हॉलिडे अन् मालिकेचं शूट, सुबोध भावेसाठी मुलांची कॅमेऱ्यामागची धावपळ

Veen Doghantli hi Tuten: सुबोध भावेने परदेशातून मालिकेचे शूटिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मुलांच्या मदतीने तो ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचे सीन शूट करून पाठवत असल्याचे समोर आले.
Veen Doghantli hi Tuten
Veen Doghantli hi TutenSaam Tv
Published On

Subodh Bhave: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील विविध अपडेट्स तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकताच त्याने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सुबोध सध्या परदेशात कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेत असतानाही आपल्या मालिकेचे शूटिंग करत असल्याचे या व्हिडीओमधून दिसून येत आहे.

सध्या सुबोध भावे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. मालिकेतील त्याची ‘समर राजवाडे’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबतची त्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही चाहत्यांना विशेष आवडली आहे. मालिकेला मिळणारा प्रतिसाद पाहता प्रेक्षक या जोडीवर भरभरून प्रेम करत आहेत.

Veen Doghantli hi Tuten
Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

दरम्यान, सुबोधने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो परदेशात असतानाही मालिकेसाठी फोनवर बोलतानाचा एक सीन शूट करताना दिसत आहे. या व्हिडीओमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची दोन्ही मुलं या शूटिंगमध्ये त्याला मदत करत आहेत. मुलगा कान्हा कॅमेऱ्यातून सीन शूट करत आहे, तर दुसरा मुलगा मल्हार समोरच्या कलाकाराचे डायलॉग बोलून सुबोधला सीन पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे.

व्हिडीओ शेअर करताना सुबोधने एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. तो म्हणाला, “परदेशात असतानाही ‘वीण’ काही तुटत नाही. कुटुंबासोबत फिरायला आलोय, पण काम थांबता कामा नये. समरची मिशी बरोबर घेऊन फिरतोय. सीन आला की योग्य जागा शोधून शूट करतो आणि पाठवतो. मदतीला माझी दोन्ही मुलं आहेत. कान्हा शूट करतोय आणि मल्हार समोरच्याची वाक्यं म्हणतोय.”

याशिवाय त्याची पत्नी मंजिरी भावेचेही त्याने आभार मानले आहेत. मंजिरी आता निर्मिती क्षेत्रात काम करत असल्याने ती कलाकारांच्या कामाच्या गरजा आणि जबाबदाऱ्या समजून घेते, असेही त्याने नमूद केले. त्यामुळे परदेशात सुट्टीवर असतानाही शूटिंग सुरू ठेवण्यामागे कुटुंबाची मोठी साथ असल्याचे त्याच्या पोस्टमधून स्पष्ट होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com