Sakshi Sunil Jadhav
जेव्हा मुलगी सासरी जाते, तेव्हा तिच्या तक्रारींना माहेरकडची फॅमिली बऱ्याचदा दुर्लक्षित करतात. अर्थात आपण त्या समस्या सामान्य असल्याचं समजतो.
लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात खूप बदल होतात. मुलीच्या तोंडून आपण त्या गोष्टी ऐकूनही दुर्लिक्षित करतो. हीच एक चूक मुलीचं आयुष्य उद्धवस्त करू शकते.
पुढील माहितीत आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार ज्याने मुलीच्या घरच्या समस्या तुम्हाला समजतील आणि तुम्ही तिला योग्य मार्गदर्शन कराल.
मुलगी सतत सासरी किंवा लग्नानंतर आयुष्याबद्दल घुसमट होत असल्याचं सांगत असेल तर त्याकडे लक्ष द्या. हे मानसिक तणाव किंवा असुरक्षिततेचं लक्षण असू शकतं.
जर मुलगी सासरी कुणाशीही मोकळेपणाने बोलू शकत नसल्याची तक्रार करत असेल, तर तिच्या अडचणी समजून घ्या. नाहीतर तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल.
काय घालायचं, कुणाशी बोलायचं किंवा कसं वागायचं यावरून मुलीला सतत बोललं जात असेल तर पालकांनी योग्य दिला देणं गरजेचं आहे.
बऱ्याच मुली आई-वडिलांना काळजी वाटू नये म्हणून स्वतःच्या समस्या सांगत नाहीत. तरी सुद्धा तिची खरी परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे.
फोनवर किंवा भेटीत मुलगी नेहमीच टेन्शनमध्ये दिसत असेल तर त्यामागचं कारण शोधणं गरजेचं आहे. जास्त तणावात राहिल्याने मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
मुलीची परिस्थिती समजून घेण्यासाठी तिच्याशी भेटून किंवा शांतपणे चर्चा करा. गरज वाटत असेल तर सासरच्या मंडळींशी किंवा तिच्या नवऱ्याशी बोलून योग्य तो निर्णय घ्या.