Peddi vs Hai Jawani vs Bandar Collection : राम चरणच्या 'पेड्डी' ची डरकाळी; 'है जवानी तो इश्क होना है' अन् 'बंदर' ला धोबीपछाड, कोणी किती कमावले?

'Peddi' vs 'hai jawani toh ishq hona hai' vs 'Bandar' Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर सध्या तीन चित्रपट एकमेकांना तगडी टक्कर देताना दिसत आहेत. यात 'पेड्डी', 'बंदर' आणि 'है जवानी तो इश्क होना है' यांचा समावेश आहे, कोणी किती कमावले, जाणून घेऊयात.
'Peddi' vs 'hai jawani toh ishq hona hai' vs 'Bandar' Box Office Collection
Peddi vs Hai Jawani vs Bandar Collectionsaam tv
Published On
Summary

'पेड्डी' चित्रपट ४ जूनला रिलीज झाला

'है जवानी तो इश्क होना है' आणि 'बंदर' चित्रपट ५ जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित

राम चरणच्या 'पेड्डी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई

बॉक्स ऑफिसवर सध्या १ नव्हे २ नव्हे तर तब्बल ५ चित्रपट पाहायला मिळत आहे. मराठीत 'देऊळ बंद 2', 'तुंबाडची मंजुळा' रिलीज झाले आहेत. तर साऊथमध्ये राम चरणचा 'पेड्डी' चित्रपट रिलीज झाला आहे. तसेच बॉलिवूडमध्ये ही दोन चित्रपट रिलीज झाले आहेत. ५ जून २०२६ ला वरुण धवनचा 'है जवानी तो इश्क होना है' आणि बॉबी देओलचा 'बंदर' चित्रपट रिलीज झाला आहे. पण सध्या बॉक्स ऑफिसवर ४ जूनला रिलीज झालेल्या 'पेड्डी' चा डंका पाहायला मिळत आहे. 'पेड्डी' , 'है जवानी तो इश्क होना है' आणि 'बंदर' यांनी शुक्रवारी किती कमावले, जाणून घेऊयात.

'पेड्डी' बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'पेड्डी'ने दुसऱ्या दिवशी २६.९० कोटी रुपयांची नेट कमाई केली. पहिल्या दिवशी चित्रपटाने ५१.०० कोटी कमावले. आतापर्यंत चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई ९६.४० कोटी रुपये इतकी आहे. भारतातील एकूण ग्रॉस कमाई ११४.४९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 'पेड्डी'ने दुसऱ्या दिवशी परदेशात ८.०० कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाची परदेशातील एकूण ग्रॉस कमाई ३६.०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जगभरातील एकूण ग्रॉस कमाईचा आकडा १५०.४९ कोटी रुपयांवर गेला आहे.

'है जवानी तो इश्क होना है' बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'है जवानी तो इश्क होना है' चित्रपटाने 9,081 शोमध्ये पहिल्या दिवशी अंदाजे 7.50 कोटी रुपयांची कमाई केली. भारतातील ग्रॉस कलेक्शन 9 कोटी रुपये आहे. चित्रपटाने आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतून 2 कोटी रुपये कमावले आहेत. जगभरात चित्रपटाने 11 कोटी कमावले.

'बंदर' बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'बंदर' चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात अंदाजे 50 लाख रुपयांची कमाई केली. 1,365 शोमधून देशांतर्गत अंदाजे 60 लाख रुपयांची कमाई केली. आता वीकेंडला हे चित्रपट किती कोटींचा गल्ला जमवणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच 'है जवानी तो इश्क होना है' आणि 'बंदर' तगडी टक्कर पाहायला मिळत आहे.

'Peddi' vs 'hai jawani toh ishq hona hai' vs 'Bandar' Box Office Collection
Famous Actor Death : मनोरंजन विश्व हादरले; प्रसिद्ध अभिनेत्याची हत्या, गर्लफ्रेंडच्या मुलाने चाकूने केले सपासप वार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com