
Santosh movie : ब्रिटिश-भारतीय चित्रपट निर्माती संध्या सूरी यांचा ‘संतोष’ हा चित्रपट युनायटेड किंगडमने ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवला होता. हा चित्रपट ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्येही समाविष्ट झाला. मात्र, भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने बंदी घातली आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात दाखवलेल्या काही संवेदनशील मुद्द्यांवर आक्षेप घेतला असून, त्यात मोठ्या प्रमाणात कट्स करण्याची मागणी केली आहे.
‘संतोष’ या चित्रपटात महिलांशी संबंधित गंभीर मुद्दे, इस्लामोफोबिया आणि पोलिसांविरुद्ध हिंसाचार यासारखे विषय हाताळण्यात आले आहेत. या कारणांमुळे CBFC ला चित्रपटातील अनेक दृश्ये आणि संवाद खटकले आहेत. दिग्दर्शक संध्या सूरी यांनी सांगितले की, सेन्सॉर बोर्डाने इतक्या मोठ्या प्रमाणात आणि व्यापक कट्सची यादी पाठवली आहे की, ती लागू करणे जवळपास अशक्य आहे. त्यांच्या मते, हे कट्स केल्यास चित्रपटाची मूळ कथा आणि संदेश पूर्णपणे बदलून जाईल.
या चित्रपटात अभिनेत्री शाहाना गोस्वामी यांची प्रमुख भूमिका आहे. तिच्या अभिनयाचेही यापूर्वी कौतुक झाले आहे. ‘संतोष’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच चर्चा मिळवत असताना भारतातील ही बंदी आणि सेन्सॉर बोर्डाचा निर्णय यामुळे चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. काहींच्या मते, हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे, तर काहींनी सेन्सॉर बोर्डाच्या संवेदनशीलतेचे समर्थन केले आहे.
सध्या या प्रकरणावरून सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी संध्या सूरी आणि चित्रपटाच्या टीमला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, CBFC चा अंतिम निर्णय काय राहील आणि हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकेल का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.