Hai Jawani Toh Ishq Hona Hai: वरुण धवनचा 'है जवानी तो इश्क होना है' थिएटरमध्ये पास की फेल; प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Hai Jawani Toh Ishq Hona Hai: वरुण धवन, पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर यांच्या ‘है जवानी तो इश्क होना है’ चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक होत आहे.
Hai Jawani Toh Ishq Hona Hai
Hai Jawani Toh Ishq Hona HaiSaam Tv
Published On

Hai Jawani Toh Ishq Hona Hai: वरुण धवनचा बहुप्रतीक्षित ‘है जवानी तो इश्क होना है’ हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट ५ जून २०२६ रोजी प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘बॉर्डर २’नंतर यावर्षी प्रदर्शित झालेला वरुण धवनचा हा दुसरा चित्रपट असून, रिलीजपूर्वीपासूनच त्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

या चित्रपटाचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट विनोदी चित्रपट देणाऱ्या डेव्हिड धवन यांचा हा अखेरचा चित्रपट असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट अधिकच खास ठरला आहे. वरुण धवन आणि डेव्हिड धवन यांची हा चौथा चित्रपट आहे. याआधी ‘मैं तेरा हीरो’, ‘जुडवा २’ आणि ‘कुली नंबर १’ या चित्रपटांमध्ये या बाप-लेकाच्या जोडीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते.

Hai Jawani Toh Ishq Hona Hai
Deool Band 2 Collection: बॉक्स ऑफिसवर दुमदुमला स्वामी समर्थांचा जयघोष; 'देऊळ बंद २'ची पहिल्याच दिवशी जोरदार कमाई

‘है जवानी तो इश्क होना है’ प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले असून त्याला संपूर्ण कुटुंबासह पाहण्यासारखा मनोरंजक चित्रपट म्हटले आहे. एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लिहिले की, “हा एक परिपूर्ण बॉलीवूड एंटरटेनर आहे. रोमान्स, कॉमेडी, गोंधळ आणि भरपूर मनोरंजन या चित्रपटात पाहायला मिळतो.”

Hai Jawani Toh Ishq Hona Hai
Peddi movie: 'राम चरण तिच्याकडे वासनेच्या नजरेने...'; जान्हवी कपूरचा 'ग्लॅमरस शो-पीस' म्हणून वापर, चाहते इतके का संतापले?

तर दुसऱ्या एका युजरने डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनाचे विशेष कौतुक करत, “अशा प्रकारचे मनोरंजन केवळ डेव्हिड धवनच देऊ शकतात''. काही प्रेक्षकांनी चित्रपटाला 'धमाल एंटरटेनर' म्हटले आहे. तर एकाने लिहिलं, 'वरुण पुन्हा या चित्रपटात चुलबुल्या स्टाईलमध्ये दिसत आहे'. एकूणच हा चित्रपट प्रेक्षकांना आवडत असून येत्या काळात हा चित्रपट चांगली कमाई करण्याची शक्यता आहे.

है जवानी तो इश्क होना है’मध्ये वरुण धवनसोबत पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रोमान्स, विनोद आणि मनोरंजनाचा संगम असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत असून बॉक्स ऑफिसवरही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com