Peddi movie: 'राम चरण तिच्याकडे वासनेच्या नजरेने...'; जान्हवी कपूरचा 'ग्लॅमरस शो-पीस' म्हणून वापर, चाहते इतके का संतापले?

Peddi movie: सुपरस्टार राम चरण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा ‘पेड्डी’ नुकताच रिलीज झाला आहे. पण रिलीज होताच या चित्रपटाभोवती नवा वाद निर्माण झाला आहे.
Peddi movie
Peddi movieSaam Tv
Published On

Peddi movie: दाक्षिणात्यसुपरस्टार राम चरण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पेड्डी’ नुकताच रिलीज झाला आहे. पण रिलीज होताच या चित्रपटाभोवती नवा वाद निर्माण झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रेक्षकांनी जान्हवी कपूरच्या पात्राचे चित्रण आणि तिच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः तिच्या पात्राला कथानकात पुरेसे महत्त्व देण्यात आले नसल्याचे बोलत तिचा वापर फक्त आयकॅण्डी म्हणून केला असल्याचा आरोप अनेकांनी सोशल मिडियावर करत अनेक मिम्स तयार केले आहेत.

प्रेक्षकांच्या मते, चित्रपटातील अचियम्मा या जान्हवीच्या पात्राचा उपयोग केवळ नायकाची प्रेयसी म्हणून करण्यात आला आहे. तसेच हिरोला तिच्याबद्दल आकर्षण वाटावं म्हणून अश्लिल प्रकारे तिचे सीन शूट करण्यात आले आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्सनी असे मत व्यक्त केले की, पात्राला स्वतंत्र ओळख, उद्दिष्ट किंवा कथानकावर प्रभाव टाकणारे प्रसंग देण्यात आले नाहीत. तर एक सुंदर आकर्षक मुलगी म्हणून तिला या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तर, एका युजरने कमेंट करत म्हटले, संपूर्ण चित्रपटात राम चरण सतत तिच्याकडे वासनेच्या वाईट नजरेने पाहतो'.

Peddi movie
Nushrratt Bharuccha: लोकांचे रानटी विचार...; RCB जिंकल्यानंतर नुसरत भरुचा ट्रोल, 'त्या' आवाजाबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा

काही प्रेक्षकांनी सेन्सॉर बोर्डावरही टीका करत, चित्रपटांमधील महिलांच्या चित्रणाबाबत अधिक संवेदनशील भूमिका घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक पोस्टमध्ये चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला असून, महिला पात्राला केवळ ग्लॅमरपुरते मर्यादित ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Peddi movie
Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

दरम्यान, या चर्चेला आणखी हवा मिळाली जेव्हा जान्हवी कपूरने एका ट्रोलिंग पोस्टला सोशल मीडिया ‘लाईक’ केल्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. त्या पोस्टमध्ये ‘पेड्डी’मधील तिच्या भूमिकेवर आणि महिला पात्रांना ज्याप्रकारे दाखवले जाते त्यावर टीका करण्यात आली होती. नंतर हे ‘लाईक’ दिसेनासे झाल्याने जान्हवी खरोखरच त्या मताशी सहमत होती का, याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली.

वादाच्या पार्श्वभूमीवरही चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट ४ जूनला म्हणजे काल प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ६९.५० करोडची फक्त भारतात कमाई केली आहे. येत्या काळात हा चित्रपट आणखी जबरदस्त कमाई करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com