Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Riteish Deshmukh: ‘राजा शिवाजी’च्या सक्सेस पार्टीतील व्हायरल व्हिडीओवरून निर्माण झालेल्या वादानंतर रितेश देशमुखने स्पष्टीकरण दिले आहे. शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नसल्याचे सांगत त्याने दिलगिरी व्यक्त केली.
Riteish Deshmukh
Riteish DeshmukhSaam Tv
Published On

Riteish Deshmukh: रितेश देशमुख दिग्दर्शित अभिनित 'राजा शिवाजी' या चित्रपटाला महाराष्ट्रभरातून भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या यशानंतर संपूर्ण टीमसाठी आयोजित करण्यात आलेल्या सक्सेस पार्टीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत असून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला टी-शर्ट परिधान केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी त्याच्यावर टीका करत शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप केला.

याशिवाय, काहींनी रितेशने मद्यपान केल्याचाही आरोप केले. या सर्व आरोपांनंतर अखेर रितेश देशमुखने सोशल मीडियावर सविस्तर निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून दिलगिरीही व्यक्त केली आहे.

Riteish Deshmukh
Nushrratt Bharuccha: लोकांचे रानटी विचार...; RCB जिंकल्यानंतर नुसरत भरुचा ट्रोल, 'त्या' आवाजाबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा

रितेशने सोशल मिडियावर स्टोरीला ठेवलेल्या आपल्या निवेदनात म्हटले की, नमस्कार, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या सिनेमाच्या यशाच्या आनंदानिमित्त आमच्या संपूर्ण टीमने एक छोटेखानी आनंदोत्सव आयोजित केला होता. त्यानंतर माझा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. एक शिवप्रेमी या नात्यानं मी याचं स्पष्टीकरण देणं माझं कर्तव्य मानतो.

Riteish Deshmukh
Influencer Anita Bishnoi: रडत लाईव्ह आली अन् उचललं टोकाचं पाऊल; इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईचा लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

मी नम्रपणे स्पष्ट करू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला टी-शर्ट परिधान करून आनंद साजरा करण्यामागे त्यांचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता. तो टी-शर्ट मी चित्रपटाच्या प्रचारादरम्यान वापरत होतो. त्या दिवशीही मी प्रचारकार्य पूर्ण करून थेट कार्यक्रमात सहभागी झालो असल्याने टी-शर्ट बदलणं राहून गेलं.

Riteish Deshmukh on Viral Video
Riteish Deshmukh on Viral VideoSaam Tv

तसेच, माझ्याबाबत समाजमाध्यमांवर होत असलेल्या काही दाव्यांविषयीही स्पष्ट करू इच्छितो की, मी आजवर कधीही मद्यपान केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही. त्यामुळे या संदर्भातील कोणतेही आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत.

विशेष म्हणजे, हा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीला संबंधित कार्यक्रमाचं निमंत्रणदेखील देण्यात आलेलं नव्हतं. या कार्यक्रमाचं आयोजन ‘राजा शिवाजी’ या चित्रपटासाठी साडेतीन वर्षे अथक परिश्रम घेतलेल्या, कॅमेरामागील आणि कॅमेरासमोरील सर्व कलावंत व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करण्यात आलं होतं. तथापि, माझ्या त्या कृतीमुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, तर एक शिवप्रेमी म्हणून मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.

छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे, प्रेरणेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात अत्यंत आदर, प्रेम आणि निष्ठा आहे. ही भावना आजही तितकीच दृढ आहे आणि कायम राहील. जय शिवराय! आपला, रितेश विलासराव देशमुख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com