Nach Ga Ghuma Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nach Ga Ghuma: 'नाच गं घुमा'च्या टायटल साँगवर प्रसाद ओकने मंजिरी आणि अमृतासोबत केली जबरदस्त रील, पाहून तुम्हीही कराल कौतुक

Nach Ga Ghuma Reel: परेश मोकाशी यांचा 'नाच गं घुमा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या टायटल साँगवर अभिनेता प्रसाद ओक, मंजिरी ओक आणि अमृता खानविलकरने रिल बनवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परेश मोकाशी यांचा 'नाच गं घुमा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे टायटल साँग काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते. चित्रपटाचे टायटल साँग प्रेक्षकांना खूप जास्त आवडले आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर अनेकांनी रिल्स बनवल्या आहे. प्रेक्षकांनंतर आता मराठी कलाकारांनीही चित्रपटाच्या टायटल साँगवर रिल्स बनवली आहे.

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक, अमृता खानविलकर आणि मंजिरी ओक यांनी नाच गं घुमा या गाण्यावर रिल बनवली आहे. या रिलमध्ये प्रसाद ओक, मंजिरी ओक आणि अमृता खानविलकरने खूप सुंदर डान्स केला आहे. रिलमध्ये प्रसाद ओकला मात्र मंजिरी आणि अमृताने कामाला लावल्याचे दिसत आहे. त्यांनी प्रसादच्या हातात झाडू दिला आहे. तसेच प्रसाद भांडी घासताना, कचरा काढताना आणि बाल्कनी पुसताना दिसत आहे. एकीकडे प्रसाद काम करतोय तर दुसरीकडे मंजिरी ओक आणि अमृता खानविलकर नाच गं घुमा गाण्याच्या हुक स्टेपवर डान्स करताना दिसत आहे.

डान्सची रिल शेअर करत 'महाराणी आणि परीराणीच्या विश्वात घेऊन जाणारी..तुमच्या आमच्या घरातली गोष्ट, आशा आणि राणी सांगणार… सादर आहे ‘नाच गं घुमा’चा ट्रेलर' असं कॅप्शन दिले आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहे.

'नाच गं घुमा' चित्रपटाचे टायटल साँग खूप जास्त व्हायरल होत आहे. या गाण्यावर अनेक रिल स्टार, कलाकारांना रिल्स तयार केल्या आहे.चित्रपटाबद्दल बोलायचे तर, नाच गं घुमा चित्रपट १ मे २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर १७ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. बाईवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. चित्रपटात मुक्ता बर्वे, सुकन्या मोने, नम्रता संभेराव, मायरा वैकुळ, सुप्रिया पाठारे, आशा गोपाल, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत अशी स्टारकास्ट दिसणार आहे.

Edited By- Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांचं जाहीर कौतुक महिला आमदाराला भोवलं, पक्षप्रमुखांनी केली थेट बडतर्फीची कारवाई

Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Live News Update: सुप्रीम कोर्टाचा SIR प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार

मला ठार मारण्याची धमकी, उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लाचा राज ठाकरेंवर गंभीर आरोप | VIDEO

Chandrapur Voter: एकाच घरातील ११९ मतदारांपैकी एक महिला अखेर सापडली; नव्या दाव्यानं नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT