Amruta Khanvilkar Health Update: अमृता खानविलकर दोन महिन्यांपासून करतेय गंभीर आजारांशी सामना; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Amruta Khanvilkar News: गेल्या दोन महिन्यांपासून अमृता खानविलकर एका गंभीर आजाराचा सामना करत असल्याची माहिती तिने चाहत्यांना दिली आहे.
Amruta Khanvilkar Health Update
Amruta Khanvilkar Health UpdateInstagram/ @amrutakhanvilkar

Amruta Khanvilkar Health Update

अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अभिनयाची छाप फक्त मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्येच नाही तर, हिंदी टेलिव्हिजन सृष्टीतही सोडली. ती फक्त एक उत्तम अभिनेत्री नसून उत्तम लावण्यवती ही आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने काल न्यू इयरनिमित्त एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. सध्या तिची ती इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ती एका आजाराचा सामना करत असल्याची माहिती तिने दिली आहे. तिने आपल्या आरोग्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

Amruta Khanvilkar Health Update
Shilpa Shetty ने अशी केली नववर्षाची सुरूवात, VIDEO शेअर करत चाहत्यांना दिल्या फिटनेस टिप्स

शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अमृताने लिहिले की, "गेले दोन महिने माझे फार कठीण गेले, मी डेंग्यू आणि ब्राँकायटिस सारख्या आजाराचा मी सामना केला आहे. त्या दोन महिन्यांमध्ये मला फार थकवा जाणवत होता. त्या काळामध्ये, मी कोणत्यातरी नव्या संकटात अडकलेय, असं मला वाटायचं. पण, याच काळामध्ये माझा धीर अधिक वाढला. माझ्या मते, तुम्ही जसे आहात तसेच राहा. इतरत्र लोकं तुमचं अनुकरण आपोआप करतील. जर तुम्ही कष्ट करत असाल तर विश्वास ठेवा, पुढे सगळं काही ठीक होईल."

Amruta Khanvilkar Instagram Post
Amruta Khanvilkar Instagram PostInstagram/ @amrutakhanvilkar

पुढे अमृताने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील चाहत्यांना दिल्या. २०२२ प्रमाणेच २०२३ हे वर्ष अमृतासाठी खास ठरलं. 'चंद्रमुखी'मुळे अमृताला खूपच प्रसिद्धी मिळवून दिली. तिला अवघ्या महाराष्ट्रामध्ये 'चंद्रा' या नावानेच प्रसिद्धी दिली. अमृताच्या कामाबद्दल सांगायचे तर, लवकरच ललिता शिवाजी बाबरच्या बायोपिकमध्ये अमृता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोबतच 'कलावती' आणि 'पठ्ठे बाबुराव' या चित्रपटामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Amruta Khanvilkar Health Update
Rakul Preet Singh: लग्नबंधनात अडकणार रकुल प्रीत सिंग, पुढच्या महिन्यात बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत याठिकाणी घेणार सात फेरे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com