Shivrayancha Chhava First Look Instagram
मनोरंजन बातम्या

Shivrayancha Chhava First Look: 'वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात...!', 'शिवरायांचा छावा'चा फर्स्ट लूक आऊट

Shivrayancha Chhava Release Date: 'शिवराज अष्टक'चे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित येत्या नव्या वर्षात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Chetan Bodke

Shivrayancha Chhava First Look Out

दिग्दर्शक दिगपाल लांजेकर 'शिवराज अष्टक' यांचा नवा चित्रपट येत्या आगामी वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर येत्या नव्या वर्षात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आहे.

'शिवरायांचा छावा' चित्रपटाची जेव्हा दिग्दर्शकांकडून घोषणा करण्यात आली, तेव्हापासून एकच चर्चा रंगली ती म्हणजे चित्रपटामध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार ? या तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायची चालून आलेली सुवर्णसंधी कोणत्या कलाकाराला मिळणार हे लवकरच आपल्या समोर येणार आहे. तत्पूर्वी 'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. (Marathi Film)

ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत 'शिवरायांचा छावा' हा चित्रपट येत्या नव्यावर्षात १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT