OTT Release December 4th Week: यंदाच्या विकेंडला होणार फुल्ल टू धमाल; रिलीज होणार 'या' वेबसीरिज आणि चित्रपट

OTT Release This Week: १८ डिसेंबर ते २४ डिसेंबर या दिवसामध्ये ओटीटीवर बॉलिवूडसह टॉलिवूड आणि हॉलिवूडमधील चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होणार आहेत.
OTT Movies and Web Series (18 - 24 December)
OTT Movies and Web Series (18 - 24 December)OTT Movies and Web Series (18 - 24 December) - Saam Tv
Published On

OTT Movies and Web Series (18 - 24 December)

चित्रपट (Film), वेबसीरीज (Web Series) आणि वेबशो (Web Show) पाहण्याचा प्रेक्षकांचा कल सर्वाधिक वाढला आहे. अनेक सिनेरसिक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरचा पर्याय न निवडता ओटीटीचाच पर्याय निवडताना दिसतात.

ओटीटीवर (OTT Platform) नवीन चित्रपट आणि वेबसीरीजच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. यंदाचा आठवडा आणि पुढचा आठवडा Year Ending मुळे खास असणार आहे. ओटीटीवर नवीन वेबसीरीज आणि चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच खास असणार आहे. चला तर जाणून घेऊया डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये कोणकोणते चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होणार आहेत... (Bollywood Film)

Mission Start Ab
Mission Start AbSaam Tv

मिशन स्टार्ट अब- Mission Start Ab

१९ डिसेंबरपासून 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ' (Amazone Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'शार्क टँक' प्रमाणेच 'मिशन स्टार्ट अब' नावाचा शो सुरु होत आहे. यामध्ये मसाबा गुप्ता आणि सायरस साहुकर होस्ट म्हणून तर, कुणाल बहल, अनिशा सिंग आणि मनीष चौधरी हे तिघे गुंतवणूकदारांच्या भूमिकेत दिसणार आहेत. (OTT)

Percy Jackson & the Olympians
Percy Jackson & the OlympiansSaam Tv

पर्सी जॅक्सन अँड द ऑलिंपियन- Percy Jackson & the Olympians

'पर्सी जॅक्सन अँड द ऑलिंपियन' ही वेबसीरीज येत्या २० डिसेंबरला 'डिज्ने प्लस हॉटस्टार' (Disney Plus Hotstar) वर रिलीज होणार आहे. उत्तम कथानक असलेल्या ह्या सीरीजमध्ये मुख्य भूमिकेत वॉकर स्कोबेल, लीह सावा जेफ्रीज, आर्यन सिम्हाद्रा, व्हर्जिनिया कुल, ग्लिन टर्मन, जेसन हे कलाकार आहेत. (Web Series)

Dragons of Wonderhatch
Dragons of WonderhatchSaam Tv

ड्रॅगन्स ऑफ वंडरहॅच- Dragons of Wonderhatch

'ड्रॅगन्स ऑफ वंडरहॅच' ही हॉलिवूड वेबसीरीज येत्या २० डिसेंबरला 'डिज्ने प्लस हॉटस्टार' (Disney Plus Hotstar)वर रिलीज होणार आहे. (Hollywood)

Curry And Cyanide
Curry And CyanideSaam Tv

करी आणि सायनाइड- Curry And Cyanide

'करी अँड द सायनाइड' हा एक मर्डर मिस्ट्री डॉक्यूमेंट्री आहे. येत्या २२ डिसेंबरला ही डॉक्यूमेंट्री 'नेटफ्लिक्स' (Netflix) या ओटीटीवर रिलीज होणार आहे. (Bollywood)

Dry Day
Dry DaySaam Tv

ड्राय डे- Dry Day

'ड्राय डे' या कॉमेडी सीरीजमध्ये जितेंद्र कुमार आणि श्रिया पिळगावकर मुख्य भूमिकेत दिसत आहे. चित्रपट येत्या २२ डिसेंबरला 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ' (Amazone Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

What If Season 2
What If Season 2Saam Tv

व्हॉट इफ २- What If Season 2

'व्हॉट इफ २' ही ॲनिमेटेड सीरीज मार्वल कॉमिक्सवर आधारित आहे. 'डिज्ने प्लस हॉटस्टार' (Disney Plus Hotstar) वर ही अमेरिकन ॲनिमेटेड सीरीज येत्या २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Aadikeshava
AadikeshavaSaam Tv

आदिकेशवा- Aadikeshava

'आदिकेशवा' ॲक्शन ड्रामा असलेला हा तेलुगू चित्रपट येत्या २२ डिसेंबरला 'नेटफ्लिक्स' (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com