
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार'ची अजूनही बॉक्स ऑफिसवर प्रचंड चर्चा होत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ५ आठवडे झाले असून चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करीत आहे. हा शिवराज अष्टकातील पाचवा चित्रपट असून या चित्रपटाला प्रदर्शित एक महिना होतोच तोच दिग्दर्शकांनी आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी आगमी चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचा प्रोमो शेअर करत दिग्दर्शकांनी चित्रपटाचं नाव जाहीर केलं आहे.
'शिवराज अष्टक'तील सहाव्या चित्रपटाची घोषणा करताना दिग्दर्शकांनी एक प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करताना दिग्दर्शकांनी कॅप्शन दिले की, "उजळला तेजाने, पुरंदराचा माथा, सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा, शत्रू होई परास्त, असा ज्याचा गनिमी कावा, शिवशंभूचा अवतार जणू, अवतरला ‘शिवरायांचा छावा’ छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा!’ सादरकर्ते, श्री शिवराज अष्टकाचे लेखक दिग्दर्शक श्री दिग्पाल लांजेकर आणि मल्हार पिक्चर कंपनी. ‘शिवरायांचा छावा’१६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!" अशा आशयाची कॅप्शन लिहिली आहे.
मल्हार पिक्चर कंपनी आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट चित्रपटाचे सादरकर्ते आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर असून चित्रपटाची निर्मिती वैभव भोर आणि किशोर पाटकर यांनी केली आहे. नुकतीच चित्रपटाची घोषणा झाली असून अद्याप चित्रपटाच्या स्टारकास्टची घोषणा झालेली नाही.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपट गेल्या २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तान्हाजी मालुसरेंची यशोगाथा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने पाच आठवड्यात १२.९४ कोटींची कमाई केली आहे. फक्त समीक्षकच नाही तर, सिनेसृष्टीतील कलाकार आणि प्रेक्षकांच्याही पसंदीस हा चित्रपट उतरला आहे. सध्या सोशल मीडियावर हा चित्रपट लवकरच 'अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार अशी चर्चा होत आहे, पण अद्याप निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.