Sambhaji Maharaj Jayanti celebrations: इंग्लंडमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti in England : इंग्लंडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनची स्थापना
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti in England
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti in Englandsaam tv

England Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti celebrations: छञपती संभाजी महाराज यांच्या 365 व्या जयंतीचा उत्साह इंग्लंडमध्ये ही पाहायला मिळाला. लंडनमधील छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनच्या माध्यमातून हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली.

लंडनमधील डबल ट्री बाय हिल्टन हॉटेलच्या सभागृहात भारतीय विद्यार्थ्यांनी अणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन शंभू राजांच्या मूर्तीवर दुग्ध अभिषेक करुण पूजन करत अभिवादन केले. तसेच लंडनमधील मार्बल आर्च परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रॅली देखील काढण्यात आली.

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti in England
Karnataka CM News : मोठी बातमी! कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय खरगेंच्या हाती, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ठराव मंजूर

याच वर्षी याच ठिकाणी पहिल्यांदाच 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त या छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर आता याच असोसिएशनच्या वतीने संभाजी महाराजा जयंतीचा भव्य कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. (Latest Political News)

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti in England
Mumbai Coastal Road: कोस्टल रोडला 'छत्रपती संभाजी महाराज' यांचं नाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा

या निमित्ताने इंग्लंडमधील भारतीय विद्यार्थ्याच्या हितासाठी एक सामजिक चळवळ देखील उभी करण्यात आली आहे. याद्वारे भारतातून इंग्लंडमध्ये शिक्षण अथवा नोकरीसाठी येणाऱ्या भारतीयांसाठी हक्काचे संघटन मिळणार असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष धीरज सिंग तौर यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com