Mumbai Coastal Road: कोस्टल रोडला 'छत्रपती संभाजी महाराज' यांचं नाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा

Mumbai Coastal Road: राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
Coastal Road
Coastal RoadSaam TV

Mumbai News: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग म्हणजेच कोस्टल रोडला 'छत्रपती संभाजी महाराज' यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे पहिल्यांदाच आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.

राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!' (Latest Marathi News)

Coastal Road
Devendra Fadnavis on Mhada Mumbai : मुंबईकरांचं घराचं स्वप्न होणार पूर्ण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Coastal Road
Karnataka Next CM : कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी

कसा आहे कोस्टल रोड प्रकल्प?

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा 12,000 कोटींचा प्रकल्प आहे, ज्यात भारताच्या मुंबईच्या पश्चिम किनार्‍यावर 8-लेन, 29.2 किमी लांबीचा किनारी रस्ता असेल. हा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने सुरू केला आहे.

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचा वेळ 2 तासांवरून 40 मिनिटांपर्यंत कमी करणे अपेक्षित आहे. यामुळे शहरातील सध्याच्या रस्त्यांची वर्दळ कमी होईल आणि मुंबईचा एकंदरीत संपर्क सुधारेल, अशी अपेक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com