मुंबई: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगाथा प्रेक्षकांच्या समोर आणत आहेत. ती गाथा प्रेक्षकांना भावताना ही दिसत आहे. फत्तेशिकस्त, फर्जंद, पावनखिंड, शेर शिवराज या सिनेमांनंतर शिवरायांच्या गाथेतील पाचवे पुष्प "सुभेदार" या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी आपल्या प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
‘शेर शिवराज’ या चित्रपटाची ५३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये (International Film Festival of India) निवड करण्यात आली आहे. चित्रपटाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गोव्यात होत असलेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी २०२२मध्ये ' शेर शिवराज' चित्रपटाची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाची ' इंडियन पॅनोरमा' विभागात निवड करण्यात आली आहे. ही माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टर शेअर करत माहिती दिली. (Marathi Movie)
इफ्फी पुरस्कारासाठी एकूण भारतीय चित्रपट तीनशे हून अधिक होते त्यातील २५ फिचर फिल्म्सची निवड करण्यात आली आहे. त्यात 'शेर शिवराज' ने ही आपला मान पटकवला आहे. हा पुरस्कार सोहळा गोव्यात २० ते २८ नोव्हेंबरमध्ये रंगणार आहे.
चित्रपटाची निवड झाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणतात, ' 6 वर्षापासून करत असलेल्या शिवरायांच्या मालिकेला अखेर यश मिळत आहे. एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग होणे खूप मोठी गोष्ट आहे. चित्रपटातील कलाकृती उत्तम असल्याची ही पोचपावती आहे.'
चित्रपटाचे निवड झाल्यानंतर चित्रपटाचे निर्माते- अभिनेते म्हणतात, 'चित्रपटाची निवड होणे आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे. शिवरायांची मालिका प्रेक्षकांच्या समोर आणण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रेक्षकांसमोर शिवरायांची महती सादर करायची होती. अखेर ती यशस्वी होत आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.