Jhimma 2 Trailer Instagram
मनोरंजन बातम्या

Jhimma 2 Trailer: कॉमेडी, इमोशन्स आणि ड्रामा; ‘झिम्मा २’ मधून उलगडणार ७ बायकांची अनोखी कहाणी; ट्रेलर बघाच

Jhimma 2 Film: हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Jhimma 2 Trailer Out

यंदाची दिवाळी सिनेरसिकांसाठी खास असणार आहे. ह्याच आनंदाच्या सणाचा आनंद आणखीन द्विगुणीत होणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. यावेळी ट्रेलर लॉंचिंग कार्यक्रमामध्ये दिव्यांचा झगमगाट, विविध रंगाचे कंदील, आकर्षक रांगोळी, उत्साही वातावरण आणि ट्रेडिशनल लूक करत कलाकारांनी हजेरी लावली होती. (Marathi Film)

ट्रेलर लॉंचिंग इव्हेंटला चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, चित्रपटाच्या गायकांसह संपूर्ण चित्रपटाची टीम उपस्थित होती. यावेळी सर्व उपस्थितांनी दिवाळी सण मोठ्या थाटामाटात सण साजरा करीत चविष्ट फराळाचा आस्वाद घेतला. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्या सात मैत्रिणींचे रियुनियन झाले. (Social Media)

‘झिम्मा २’चा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना, सात बहिणींनी परदेशामध्ये केलेली धम्माल मस्ती दिसत आहे. कॉमेडी, इमोशन्स आणि मेलो ड्रामाने भरलेला हा ट्रेलर पाहून सर्वांनाच चित्रपट पाहण्याची इच्छा झाली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून सोशल मीडियावर सर्वांच्याच अभिनयाची चर्चा होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात, निर्मिती सावंत यांच्या ड्रायव्हिंगने होते. त्यांची ड्रायव्हिंग पाहून त्यांची सहकारी सुचित्रा बांदोडकर घाबरतात. त्यांची विचित्र ड्रायव्हिंग पाहून परदेशातले पोलिस त्यांची अडवणूक करतात. आपल्या तोडक्यामोडक्या इंग्रजीमध्ये निर्मिती त्या पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न करतात. (Actress)

पुढे ट्रेलरमध्ये, या सातही मैत्रिणी इंदूच्या ७५ व्या वाढदिवसासाठी एकत्र आलेल्या आहेत. आधी पाच जणांची असलेली गँग, आता सात जणींची गँग दिसणार आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबत चित्रपटामध्ये रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे या दोघीही झिम्मा गँगमध्ये सहभागी झाल्या आहेत. ‘बाई होणं म्हणजे फक्त आई होणं नाही. शेवटचा श्वास आहे तोपर्यंत जगून घ्यायचं...’ या वाक्याने ट्रेलरची शान वाढवली आहे. कॉमेडी, इमोशन्स आणि मेलो ड्रामाने भरलेल्या या ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत सोबतच हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’मध्ये मुख्य भूमिकेत, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर अशी दमदार स्टारकास्ट दिसत आहे. चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Astrology: स्वप्नात 'या' गोष्टी दिसणं असतं शुभ, धनलाभागाचे मिळतात संकेत

Maharashtra Live News Update: रेल्वे युनियनच्या 2 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Sindhudurg Tourism : हिवाळ्यात सिंधुदुर्गमधील 'हे' अनोखं ठिकाण पाहा, आयुष्यभर ट्रिप विसरणार नाही

Sangli : सांगलीत 'मुळशी पॅटर्न'! दलित महासंघाच्या अध्यक्षांच्या हत्येनंतर आणखी एकावर हल्ल्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Politics: NCP शरद पवार गटाला भाजपचा मास्टरस्ट्रोक, बड्या नेत्यासह सरपंच-उपसरपंचांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT