Laxmikant Berde And Mahesh Kothare Friendship Saam Tv
मनोरंजन बातम्या

Laxmikant Berde Birthday: लक्ष्याने महेश कोठारे यांच्या चित्रपटासाठी फक्त एक रूपया घेतलं होतं मानधन, तुम्हाला माहितीये का हा किस्सा?

Laxmikant Berde News: लक्ष्या यांनी महेश यांच्या एका चित्रपटामध्ये फक्त एक रुपये इतके मानधन आकारलं होतं.

Chetan Bodke

Laxmikant Berde And Mahesh Kothare Friendship

मराठी सिनेसृष्टीतला विनोदाचा बादशाह म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे. २६ ऑक्टोबर १९५४ रोजी या हरहुन्नरी आणि बहुआयामी अभिनेत्याचा वाढदिवस असतो. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची जितकी रुपेरी पडद्यावर घट्ट मैत्री होती, तितकीच रियल लाईफमध्येही घट्ट मैत्री होती. सोशल मीडियावर लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्या मैत्रीचे अनेक किस्से व्हायरल होतात.

त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्रित कामही केलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का?, लक्ष्या यांनी महेश यांच्या एका चित्रपटामध्ये फक्त एक रुपये इतके मानधन आकारलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महेश आणि लक्ष्मीकांत यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्रित काम केलं होतं. रिल लाईफप्रमाणेच त्यांची रियल लाईफमध्येही फ्रेंडशिप खूप घट्ट होती. त्यांनी ‘धुमधडाका’ या चित्रपटातही एकत्रित काम केलं होतं. खरंतर, ‘प्यार किये जा’ या हिंदी चित्रपटाचा ‘धुमधडाका’ हा चित्रपट मराठी रिमेक आहे. (Marathi Actors)

या चित्रपटाची स्टारकास्ट आधीच ठरलेली होती. पण हिंदी चित्रपटामध्ये मेहमुद यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी महेश कोठारे यांना त्या तोडीचा कलाकार मिळत नव्हता. त्यावेळी महेश यांच्या आईचे आणि वडीलांचे मराठी रंगभुमीवर एक नाटक सुरु होते. त्या नाटकाचे नाव होतं ‘झोपी गेलेला जागा झाला’.

या नाटकामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या बबन प्रभुणे यांचे अचानक निधन झाले. त्यांच्या जागी लक्ष्मीकांत बेर्डे यांची निवड झाली. जेव्हा महेश यांनी ते नाटक पाहिलं. जेव्हा त्या नाटकातला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय पाहिला, त्यावेळी महेश कोठारे यांना ‘प्यार किये जा’या चित्रपटामध्ये मेहमुद यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी लक्ष्मीकांत बेर्डे अगदी परफेक्ट कलाकार वाटले. लक्ष्मीकांत बेर्डे यांची ‘धुमधडाका’मध्ये निवड झाली. (Marathi Film's)

‘धुमधडाका’ हा चित्रपट महेश कोठारे यांनी दिग्दर्शन केलेला हा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे त्यांच्याकडे फारसे पैसेही नव्हते. ज्यावेळी त्यांच्यामध्ये चित्रपटाबद्दल बोलणी झाली, चर्चा केली. त्या चर्चेनंतर महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत यांचा होकार मिळवला.

होकार मिळताच क्षणी महेश यांनी आपल्या खिशातून एक रुपयाचं नाणं काढलं आणि ते लक्ष्मीकांत यांना दिलं. त्या एका रुपयातच त्यांनी महेश कोठारे दिग्दर्शित ‘धुमधडाका’ हा चित्रपट केला. या चित्रपटातूनच लक्ष्मीकांत यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमधून चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले. आपल्या सिनेकारकिर्दित महेश आणि लक्ष्मीकांत यांनी झपाटलेला, माझा छकुला, धांगडधिंगा, पछाडलेला अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

SCROLL FOR NEXT