Prasad Oak Gave MHJ Team Party Instagram
मनोरंजन बातम्या

Prasad Oak Gave MHJ Team Party: 'अखेर पार्टी दिली…'; प्रसाद ओकने हास्यजत्रेच्या टीमला दिलेलं प्रॉमिस केलं पूर्ण, फोटो शेअर करत कलाकारांनीही मानले आभार

Maharashtrachi Hasyajatra Team: प्रसाद ओक सध्या मराठी सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता तर आहेच पण सोबतच तो एक उत्कृष्ट दिग्दर्शकही आहे. प्रसाद ओकला अनेकदा हास्यजत्रेची टीमने 'तू पार्टी कधी देणार आहेस ?' असा सवाल उपस्थित केला होता.

Chetan Bodke

Prasad Oak Gave MHJ Team Party

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. गेल्या काही वर्षात कार्यक्रमाने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. कार्यक्रमातील अनेक सेलिब्रिटी आपल्या कॉमेडीमुळे काही वर्षातच मोठी ऊंची गाठली आहे. या सर्व स्पर्धकांनी सादर केलेल्या स्किटचे परिक्षण अभिनेता प्रसाद ओक करत आहे. (Marathi Film)

प्रसाद ओक सध्या मराठी सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता तर आहेच पण सोबतच तो एक उत्कृष्ट दिग्दर्शकही आहे. प्रसाद ओक २०२२ पासून कमालीचा प्रकाश झोतात आहे. तेव्हापासून हास्यजत्रेची टीम प्रसादला 'पार्टी कधी देणार आहेस ?', सवाल उपस्थित केला होता.

सोबतच, प्रसादला अनेकदा स्किटमधून पार्टी देणार आहे? प्रश्न विचारला जात होता. अखेर प्रसादने हास्यजत्रेच्या टीमला पार्टी दिली आहे. याबद्दलची माहिती त्याने स्वत: चाहत्यांना दिली आहे. (Maharashtrachi Hasyajatra)

आपल्या स्किटमधून समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, दत्तू मोरे, शिवाली परबने प्रसादला पार्टीबद्दल विचारलं होतं. अखेर या हास्यजत्रेच्या टीमला प्रसादने पार्टीने दिलेली आहे. प्रसादने गेल्या काही दिवसांपूर्वी घर घेतलं होतं. त्याच्या घराच्या वास्तुशांतीच्या पुजेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनीही उपस्थिती लावली होती. (Marathi Actors)

नव्या घराची आणि प्रसादला मिळत असलेले घवघवीत यशाबद्दल त्याने ही हास्यजत्रेच्या टीमला पार्टी दिलेली आहे. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्रामवर पार्टी दरम्यानचे काही फोटो शेअर केलेले आहेत. त्यासोबतच हास्यजत्रेतल्या अनेक कलाकारांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत प्रसाद ओकचे आभार मानले. (Marathi Actress)

प्रसाद ओकने पार्टी दरम्यानचे फोटो शेअर करताना कॅप्शन दिले की, "ऐका हो ऐका… अखेर हास्यजत्रेच्या टीमला पार्टी दिलेली आहे… समस्त रसिकांनी या घटनेची नोंद घ्यावी…!!! मंडळ आभारी आहे…!!!" यावेळी हास्यजत्रेची संपूर्ण कास्ट क्रु उपस्थित होते. यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे लेखक सचिन गोस्वामी, वनिता खरात, रोहित माने, शिवाली परब, दत्तु मोरे, प्रभाकर मोरे, प्राजक्ता माळी, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पृथ्विक प्रताप, निमिश कुलकर्णी सह सर्वच स्टारकास्ट यावेळी उपस्थित होते. यांच्यासोबत प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक सुद्धा फोटोमध्ये दिसत आहे. अनेकदा प्रसाद ओक मी तुम्हाला पार्टी देणार असं बोलला होता. अखेर प्रसाद ओकने हास्यजत्रेच्या टीमला पार्टी दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसत आहे. (Social Media)

प्रसाद ओक प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. त्याने दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळाल्यानंतर त्याने हास्यजत्रेच्या टीमला पार्टी दिली होती. प्रसादच्या कामाबद्दल बोलायचे तर, प्रसाद ओक सध्या ‘वडापाव’, ‘जिलबी’, ‘धर्मवीर २’, ‘महापरिनिर्वाण’, ‘पठ्ठे बाबुराव’, ‘रीलस्टार’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. यातील अनेक चित्रपटांची शुटिंग सध्या सुरु काहींची अजून शुटिंग बाकी आहे. त्याच्या ह्या आगामी चित्रपटाची नेटकऱ्यांना कमालीची उत्सुकता आहे. प्रसादचे हे सर्व चित्रपट २०२४ मध्येच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

26th July Rain : पालघरसह पुण्याला रेड अलर्ट, पाऊस धुमाकूळ घालणार, दोन जिल्ह्यात शाळांना सुट्टी

Google मधील नोकरी सोडली, सलग तीनदा UPSC परीक्षेत अपयश; चौथ्या प्रयत्नात थेट पहिली रँक, IAS अनुदीप दुरीशेट्टी यांची Success Story

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

SCROLL FOR NEXT