बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरली आहे. 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातून प्रचंड प्रकाशझोतात आलेली तनुश्री दत्ता गेल्या काही वर्षांपीसून कधी मी-टू मोहिमेसाठी तर कधी न्यायालयीन खटल्यामुळे ती चर्चेत असते. तनुश्री दत्ता आज ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. तनुश्रीला तिच्या सिनेकारकिर्दित फार जास्त चित्रपट मिळाले नाहीत. पण असं असलं तरीही ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कमालीची चर्चेत आली. आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या बद्दल खास गोष्टी जाणून घेणा आहोत. (Bollywood)
तनुश्रीचा जन्म १९ मार्च १९८४ रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथे एका बंगाली कुटुंबात झाला. जमशेदपूरमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर ती पुण्याला आली. तिने पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. यानंतर तनुश्रीने मनोरंजन विश्वाकडे वळण्याचा निर्णय घेतला. यासोबतच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी म्हणजेच २००४ मध्ये तनुश्री दत्ता मिस इंडिया बनली होती. इतकेच नाही तर, तनुश्री ने मिस युनिव्हर्स स्पर्धेतही देशाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, तनुश्रीला या स्पर्धेत फक्त टॉप १०मध्येच स्थान मिळवता आले. तिचं 'मिस युनिव्हर्स' होण्याचं स्वप्न भंगलं. (Bollywood Actress)
२००४ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तनुश्री दत्ताने सर्वात आधी 'चॉकलेट' चित्रपटामध्ये काम केले होते. पण 'आशिक बनाया आपने' या चित्रपटाने तिला फार मोठी प्रसिद्धी झाली. या चित्रपटातून ती एका रात्रीत स्टार झाली. यानंतर तिने 'भागम भाग', 'ढोल' आणि 'गुड बॉय-बॅड बॉय' सारखे चित्रपट केले. पण तिला काही अभिनयामध्ये यश मिळेना. २०१० मध्ये रिलीज झालेला 'अपार्टमेंट' हा तिच्या सिनेकारकिर्दितला शेवटचा चित्रपट ठरला. अनेक चित्रपटांमध्ये काम करूनही तनुश्रीला चित्रपटसृष्टीत जे स्थान मिळायला हवे होते ते मिळाले नाही. यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीला अलविदा केला आणि अमेरिकेला शिफ्ट झाली. (Bollywood News)
२०१८ मध्ये तनुश्री भारतामध्ये आली होती. त्यावेळी ती मी टू मोहिमुळे प्रचंड गाजली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तनुश्रीनं मीटूचा आरोप केला होता. तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्या विरोधात Me Too चा आरोप केला होता. नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे तनुश्रीनं सांगितलं होतं. तिनं सांगितलं की नाना पाटेकर यांच्या विरोधात बोलल्यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.