Alibaba Aani Chalishitale Chor Trailer: आंबट-गोड थोडीशी तिखट..., 'अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Alibaba Aani Chalishitale Chor Trailer Released: अखेर आज या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.
Alibaba Aani Chalishitale Chor Trailer
Alibaba Aani Chalishitale Chor TrailerSaam Tv
Published On

Alibaba Aani Chalishitale Chor Movie:

मराठमोळा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave), मुक्ता बर्वे (Mukta Barve), उमेश कामत (Umesh Kamat) आणि श्रृती मराठे (Shruti Marathe) यांचा आगामी चित्रपट 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर'ची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाचा टीझर आणि गाणी काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आली होती.

प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीज होण्याची वाट पाहत होते. अखेर आज या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर (Alibaba Aani Chalishitale Chor Trailer) पाहून प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा धमाकेदार ट्रेलर सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकारांनी आपले ‘चाळीशी’तील किस्से शेअर करण्यासोबतच ‘साला कॅरेक्टर’ या गाण्यातील हूक स्टेपही सादर केली. ‘फॅार्टी इज द न्यू थर्टी’ असे हल्ली म्हटले जाते आणि याचा अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटात येणार आहे.

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’च्या ट्रेलरमध्ये सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे हे ‘यंगस्टर्स’ धमाल आणि मजा-मस्ती करताना दिसत आहेत. मात्र ट्रेलर पाहाता त्यांच्या आयुष्यात काहीतरी ट्विस्ट आलेला दिसत आहे. या सर्वांमधील चोर नेमका कोण? या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर म्हणजे २९ मार्चला मिळणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी सांगितले की, 'चाळीशी हा आयुष्याच्या असा टप्पा आहे जेव्हा आलेल्या स्थैर्यामुळे जगण्यात एक विचित्र एकसुरीपणा येतो आणि मग सुरू होतो 'एक्साईटमेंट' शोधण्याचा खेळ! आणि मग जी धमाल घडते आणि असलेल्या नात्यांचीच पुन्हा नव्याने ओळख होते हे मांडणारा हा चित्रपट आहे. चित्रपट बघताना प्रेक्षक मनमुराद हसतीलही आणि कधी भावनिकही होतील. हा चित्रपट जरी चाळिशी उलटून गेलेल्या चोरांचा आहे तसाच चाळिशीत येऊ घातलेल्या चोरांसाठीही आहे.'

Alibaba Aani Chalishitale Chor Trailer
Randeep Hooda: स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं दिसण्यासाठी रणदीप हुड्डाने घेतली बरीच मेहनत, घटवलं 30 किलो वजन

दरम्यान, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स एल. एल. पी निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे हे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, श्रुती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि अतुल परचुरे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे निर्माते आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये या 'चाळीशी'तल्या चोरांचे काय होणार हे जाणून घेण्यासाठी २९ मार्चला हा चित्रपट पाहावा लागणार आहे.

Alibaba Aani Chalishitale Chor Trailer
Dabangg 4 Movie: 'चुलबुल पांडे' धुमाकूळ घालायला पुन्हा सज्ज, अरबाज खानने दिली सलमान खानच्या 'दबंग 4'बाबत मोठी अपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com