Randeep Hooda: स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं दिसण्यासाठी रणदीप हुड्डाने घेतली बरीच मेहनत, घटवलं 30 किलो वजन

Randeep Hooda Weight Loss: या चित्रपटामध्ये रणदीपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. तर अंकिता लोखंडेने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. रणदीपने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे.
Randeep Hooda Swatantrya Veer Savarkar Movie
Randeep Hooda Swatantrya Veer Savarkar MovieSaam Tv
Published On

Swatantrya Veer Savarkar Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सध्या त्याचा आगमी चित्रपट 'स्वातंत्र्यवीर सावकर'मुळे (Swatantrya Veer Savarkar Movie) चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) मुख्य भूमिकेत आहे.

सध्या रणदीप आणि अंकिता चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये रणदीपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. तर अंकिता लोखंडेने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. रणदीपने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याने विनायक दामोदर सावरकर यांच्या भूमिकेत फिट बसण्यासाठी खूप वजन कमी केले.

नुकताच विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रंजीत सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटातील रणदीप हुड्डाच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. त्यांनी एएनआय या वृ्त्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, रणदीप हुड्डासोबत माझी अनेकदा चर्चा झाली. त्याने हा चित्रपट तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली. ऐवढंच नाही तर त्याने आपले ३० किलो वजन देखील कमी केले आहे.' रंजीत सावरकर यांनी पुढे असे देखील सांगितले की, चित्रपट हे एक असे माध्यम आहे की, या माध्यमातून इतिहासाला नव्या पिढीपर्यंत पोहचवले जाऊ शकते. मला आशा आहे की भविष्यात त्यांच्यावर आणि देशातील इतर क्रांतिकारकांवर आणखी चित्रपट तयार केले जातील.'

'स्वातंत्र्यवीर सावकर' या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डाने फक्त मुख्य भूमिका साकारली नाही. तर त्याने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. रणदीप हुड्डा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचा सहनिर्माता देखील आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. हा चित्रपट येत्या २२ मार्चला प्रदर्शित होणार आहे. फक्त हिंदीच नाही तर मराठी भाषेमध्ये देखील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, रणदीप हुडाचा भारतीय चित्रपट उद्योगाशी संबंध 2001 मध्ये सुरू झाला. पण, त्याला ती ओळख 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'साहेब', 'बीवी और गँगस्टर', 'हायवे', 'सरबजीत' आणि इतर चित्रपटांमधून मिळाली. सध्या तो स्वतंत्र वीर सावरकर या ऐतिहासिक चरित्रात्मक चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे, जो त्याचे दिग्दर्शनही पदार्पण आहे. यामध्ये त्यांनी विनायक दामोदर सावरकरांची भूमिका साकारली आहे. काही काळापूर्वी, कार्यकर्त्याच्या नातवाने रणदीपच्या आजोबांच्या भूमिकेचे कौतुक केले होते.

Randeep Hooda Swatantrya Veer Savarkar Movie
Yodha Box Office Collection Day 3: विकेंडला बॉक्स ऑफिसवर दिसली 'योद्धा'ची जादू, 3 दिवसांत किती केली कमाई?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com