बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra) ॲक्शनपॅक्ड चित्रपट 'योद्धा' (Yodha Movie) चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या ॲक्शन चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा देशाच्या रक्षणासाठी कमांडोच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्राचा ॲक्शन लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे. हा चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित झाला. सिद्धार्थच्या योद्धाची ज्याप्रकारे चर्चा होत होती त्यावरून हा चित्रपट पहिल्या वीकेंडमध्ये अजय देवगणच्या 'शैतान' चित्रपटाला मागे टाकू शकेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण चित्र मात्र वेगळेच आहे.
सिद्धार्थचा 'योद्धा' चित्रपट अजय देवगणच्या 'शैतान' चित्रपटाची बरोबरी करू शकला नाही. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात फारसे यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट बऱ्यापैकी कमाई करत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी जास्त कमाई केली नव्हती. पण दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ झाली. तिसऱ्या दिवशी देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली. विकेंडचा या चित्रपटाला चांगला फायदा झाला.
सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशी खन्ना यांच्या योद्धा चित्रपटाने पहिल्या दिवशी ४.२५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ६.०१ कोटी रुपयांची कमाई केली. तर दिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी देखील या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ७.२५ कोटींची कमाई केली. अशाप्रकारे योद्धा चित्रपटाने तीन दिवसांमध्ये १७.५१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पुढचा आठवडा देखील योद्धासाठी चांगला ठरू शकतो. हा आठवडा योद्धाचे भवितव्य ठरवणार आहे. हा आठवडा सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांच्या चित्रपटासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. पुढच्या सोमवारी म्हणजे 25 मार्च रोजी होळी आहे. त्यामुळे दुसरा विकेंड आणि होळीची सुट्टी याचा फायदा योद्धाला होऊ शकतो. लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे योद्धाच्या कमाईत वाढ होऊ शकते. सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटींचे वर्ल्डवाइड कलेक्शन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.