Shaitaan Box Office Collection Day 10: अजय देवगणचा 'शैतान' सुसाट, 10 दिवसांत केलं 100 कोटीपार कलेक्शन

Shaitaan Movie: शैतान चित्रपट रिलीज होऊन १० दिवस पूर्ण झाले आहेत. 'शैतान' चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून सर्वांना चकित केले आहे. या चित्रपटाने १० दिवसांत बक्कळ कमाई केली आहे.
Shaitaan Box Office Day 10 Box Collection
Shaitaan Box Office Day 10 Box CollectionSaam Tv
Published On

Shaitaan Box Office Collection:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn), आर माधवन (R Madhvan) आणि ज्योतिका स्टारर 'शैतान' चित्रपटाला (Shaitaan Movie) प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शैतान चित्रपटांची सध्या बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चित्रपट रिलीज होऊन १० दिवस पूर्ण झाले आहेत. 'शैतान' चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून सर्वांना चकित केले आहे. अजय देवगणच्या 'शैतान' चित्रपटाने 10व्या दिवशी कमालीची कमाई केली आहे. 'शैतान' चित्रपटाने 10व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला आहे.

अजय देवगण आणि आर माधवनच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'शैतान' चित्रपटाच्या कथेसोबतच कमाईचीही सध्या चर्चा होत आहे. 'शैतान' चित्रपटाने हळूहळू बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला आहे. अजय देवगणच्या 'शैतान' चित्रपटाने 10व्या दिवशी हा पराक्रम दाखवला आहे. 'शैतान' चित्रपटाच्या कमाईचे नवे आकडे समोर आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका स्टारर 'शैतान' 10 व्या दिवशी 9.75 कोटी रुपये कमावले आहे. यासोबतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका यांच्या 'शैतान' चित्रपटाचे बजेट खूपच कमी होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण आणि आर माधवनचा 'शैतान' चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी 65 कोटी रुपये खर्च केले आहेत. अशामध्ये या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बजेटचा आकडा ओलांडला आहे.

Shaitaan Box Office Day 10 Box Collection
Yed Lagla Premacha: 'बिग बॉस' फेम विशाल निकमचा रावडी अवतार, 'येड लागलं प्रेमाचं'चा प्रोमो पाहिला का?

दरम्यान, बॉक्स ऑफिसवर असं पहिल्यांदा घडत आहे की, एखादा हॉरर चित्रपट अशापद्धतीने कमाई करत आहे. शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी रिलीज झालेल्या या चित्रपटाने सुट्टीच्या दिवसाचा चांगला फायदा करून घेतला आहे. पहिल्या विकेंड आणि दुसऱ्या विकेंडचा या चित्रपटाला चांगला फायदा झाला. पहिल्या विकेंडला शैतान चित्रपटाच्या समोर दुसरा कोणाताच मोठा चित्रपट नव्हता. कोणतीही स्पर्धा नसल्यामुळे या चित्रपटाला चांगला फायदा होताना दिसला. आता सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' चित्रपट रिलीज झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Shaitaan Box Office Day 10 Box Collection
Elvish Yadav च्या अडचणीत वाढ, न्यायालयीन कोठडीत रवानगी; आतापर्यंत नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com