Mukesh Khanna: कितीही मोठा स्टार असला तरी तो 'शक्तीमान' होऊ शकत नाही, रणवीर सिंगवर का संतापले मुकेश खन्ना?

Ranveer Singh Play Shaktiman Role: शक्तीमान मालिकेत गंगाधर उर्फ ​​शक्तीमानची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) आजकाल त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे शक्तीमानच्या आठवणी शेअर करत आहेत आणि चाहत्यांना त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.
Mukesh Khanna On Ranveer Singh
Mukesh Khanna On Ranveer SinghSaam Tv

Mukhesh Khanna Angry On Ranveer Singh:

90 च्या दशकातील मुलांची सर्वात आवडती टीव्ही मालिका म्हणजे 'शक्तिमान' (Shaktimaan). त्या काळामध्ये ही मालिका खूपच सुपरहिट ठरली होती. या मालिकेने तेव्हा लहान मुलांना अक्षरश: वेड लावले होते. या मालिकेत गंगाधर उर्फ ​​शक्तीमानची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) आजकाल त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे शक्तीमानच्या आठवणी शेअर करत आहेत आणि चाहत्यांना त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.

सध्या 'शक्तिमान' चित्रपटाची निर्मिती आणि मुख्य कलाकारांबाबत अनेक दावे केले जात आहेत. रणवीर सिंग या चित्रपटात सुपरहिरो 'शक्तिमान'ची भूमिका साकारू शकतो असेही बोलले जात आहे. नुकताच मुकेश खन्ना यांनी या कथित अफवांवर आपली प्रतिक्रिया दिली. मुकेश खन्ना यांनी आता यूट्यूब एक व्हिडिओ आणि एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी रणवीर सिंगला (Ranveer Singh) शक्तीमान म्हणून कास्ट केल्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे.

मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्राम हँडलवर स्वतःचा आणि रणवीर सिंगचा कोलाज शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'संपूर्ण सोशल मीडिया अनेक महिन्यांपासून अफवांनी भरला होता की रणवीर सिंग शक्तीमानची भूमिका साकारणार आहे. यामुळे सर्वजण नाराज होते. मी गप्प राहिलो. पण जेव्हा चॅनेलने रणवीरला साइन केल्याची घोषणा सुरू केली तेव्हा मला तोंड उघडावे लागले. मला वाटते की अशी प्रतिमा असलेला माणूस कितीही मोठा स्टार असला तरी तो शक्तीमान होऊ शकत नाही. मी माझी पावलं मागे घेतली आहेत. आता बघू पुढे काय होते?' मुकेश खन्ना यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. ज्यामध्ये त्यांनी पेपर मॅगझिनसाठी रणवीरच्या नग्न फोटोशूटवर देखील टीका केली.

Mukesh Khanna On Ranveer Singh
Dabangg 4 Movie: 'चुलबुल पांडे' धुमाकूळ घालायला पुन्हा सज्ज, अरबाज खानने दिली सलमान खानच्या 'दबंग 4'बाबत मोठी अपडेट

रणवीरवर टीका करताना मुकेश खन्ना म्हणाले की, 'अशी कृती भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. रणवीरवर निशाणा साधत ते म्हणाले की, 'जर त्याला नग्नतेमध्ये आरामदायी वाटत असेल तर त्याने अशा देशांमध्ये जावे जिथे तो प्रत्येक तिसऱ्या सीनमध्ये न्यूड सीन देऊ शकेल.' मुकेश खन्ना यांनी असेही म्हटले आहे की, 'मी निर्मात्यांना सांगितले आहे की, तुमची प्रतिस्पर्धा ही स्पायडर मॅन, बॅटमॅन, कॅप्टन अमेरिका यांच्याशी नाही. शक्तीमान हा केवळ सुपरहिरोच नाही तर सुपर टीचर देखील झाला आहे. आता व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्यामध्ये हा गुण असला पाहिजे की जेव्हा तो बोलेल तेव्हा लोकं त्याला ऐकतील. मोठे अभिनेते आहेत पण त्यांची प्रतिमा अडथळे आणते.'

Mukesh Khanna On Ranveer Singh
Alibaba Aani Chalishitale Chor Trailer: आंबट-गोड थोडीशी तिखट..., 'अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com