Yodha Day 4 Collection: सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' बॉक्स ऑफिसवर सरस, चौथ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Yodha Box Office Collection: 'योद्धा' चित्रपट १५ मार्चला थिएटरमध्ये रिलीज झाला असून चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जाणून घेऊया, चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईबद्दल...
Yodha Day 4 Box Office Collection
Yodha Day 4 Box Office CollectionSaam Tv
Published On

Yodha Day 4 Box Office Collection

बॉलिवूडचा (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra) ॲक्शन धमाका करणाऱ्या 'योद्धा' चित्रपटाला (Yodha Movie) प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित केलेल्या ह्या ॲक्शन चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, राशी खन्ना प्रमुख भूमिकेत आहे. 'योद्धा' चित्रपट १५ मार्चला थिएटरमध्ये रिलीज झाला असून चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जाणून घेऊया, चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईबद्दल... (Bollywood)

Yodha Day 4 Box Office Collection
Tanushree Dutta Birthday: आधी प्रसिद्धी अन् नंतर डिप्रेशनची शिकार; कोणत्या चुकीमुळे तनुश्री दत्ताचं करिअर बरबाद झालं ?

या ॲक्शनपॅक्ड चित्रपटामध्ये, मुख्य भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra), दिशा पाटनी (Disha Patani) आणि राशी खन्ना (Raashii Khanna) हे चेहरे आहेत. ‘शेरशाह’नंतर बॉलिवूड सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा देशभक्तीपर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्टनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी ४.१० कोटी, शनिवारी ५.७५ कोटी, रविवारी ७ कोटी आणि सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी चित्रपटाने २.१५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने एकूण चार दिवसांत जेमतेम १९ कोटींची कमाई केलेली आहे. (Bollywood Film)

सिद्धार्थच्या 'योद्धा'ची ज्याप्रकारे सोशल मीडियावर चर्चा होत होती, त्यावरून हा चित्रपट पहिल्या विकेंडमध्ये अजय देवगणच्या 'शैतान' चित्रपटाला मागे टाकू शकेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण चित्र मात्र वेगळेच निर्माण झाले. २०२४ मध्ये दमदार कमाई करणारा चित्रपट अद्याप ठरलेला नाही. दीपिका आणि हृतिक स्टारर ‘फायटर’ शिवाय कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला नाही. या चित्रपटाचे एकूण बजेट जवळपास ५५ कोटी रुपये आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी केले आहे. (Bollywood News)

Yodha Day 4 Box Office Collection
Tiger Shroff House: टायगर झाला पुणेकर, खरेदी केलं आलिशान घर; किंमत जाणून थक्क व्हाल

सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ चित्रपटाचीही बॉक्स ऑफिसवर खास जादू चालली नाही. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. पण प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळालेला नाही. अदा शर्मा स्टारर चित्रपटाने चार दिवसातच फक्त २ कोटी २४ लाखांचीच कमाई केली. चित्रपटाने चौथ्या दिवशी फक्त २४ लाखांची कमाई केली आहे. ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे, तर या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल साह यांनी केली आहे. (Entertainment News)

Yodha Day 4 Box Office Collection
Mukesh Khanna: कितीही मोठा स्टार असला तरी तो 'शक्तीमान' होऊ शकत नाही, रणवीर सिंगवर का संतापले मुकेश खन्ना?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com