Jhimma 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhimma 2: पुढच्या ट्रिपची तयारी सुरू...; नवी धमाल, नव्या जोशात येतोय हेमंत ढोमेच्या चित्रपटाचा सिक्वेल...

सिनेरसिकांच्या प्रेमामुळे दिग्दर्शक हेमंत ढोमे ‘झिम्मा’ चित्रपटाचा आगामी सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे, नुकताच चित्रपटाचा पहिला सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Chetan Bodke

Jhimma 2: ‘झिम्मा’ने एक वर्षापूर्वी बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांच्या हा चित्रपट आयुष्याशी मिळता जुळता असल्याने त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. सिनेरसिकांच्या याच प्रेमामुळे हेमंत ढोमे ‘झिम्मा २’आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. नुकताच त्याचा एक मजेशीर अनाऊन्समेंट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करून त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित हा चित्रपट येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंद एल. राय आणि क्षिती जोग चित्रपटाचे निर्माते असून सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ आहेत.

या व्हिडीओत निर्मला (निर्मिती सावंत) पुन्हा एकदा फिरायला जाण्यासाठी त्यांच्या पतीकडे अर्थात साहेबांकडे (अनंत जोग यांच्याकडे) परवानगी मागत आहेत. यावेळी साहेबांनी ट्रीपला जायला होकार ही दिला. मात्र त्यांना नकार देत, पुन्हा एकदा ‘बाया बायाच’ ट्रीपला जायची तयारी करत असल्याचं निर्मला समजावते. साहेब मात्र निर्मलाला सूनबाईंना बरोबर घेऊन जा, असं सांगतात… आता सूनबाई कोण? यावेळी ही ट्रीप कुठे जाणार आणि यात केवळ ‘त्याच’ मैत्रिणी असणार की, आणखी मैत्रिणींची भर पडणार? हे लवकरच कळेल.

निर्माते आनंद एल. राय म्हणतात, "पुन्हा एक मराठी सिनेमा करताना आम्हाला खूप आनंद होतोय. ‘झिम्मा’ला प्रेक्षकांची चांगलीच पसंदी मिळाली. तसेच २०२१ मध्ये बॅाक्स ॲाफिसवर जबरदस्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला. चित्रपटातून एक चांगला संदेश देण्यात आला ज्याने प्रेक्षक प्रभावित झाले आणि म्हणूनच आम्ही ‘झिम्मा २’ आणण्यास चलचित्र मंडळींना पाठिंबा दिला. क्षिती आणि हेमंत सोबत काम करण्यात आनंद आहे."

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात,"‘झिम्मा’वर प्रेक्षकांनी बरेच प्रेम दिले. यातील प्रत्येकीमध्ये गृहिणींनी, तरुणींनी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. कधी दोन दिवसही एकट्या घराबाहेर न राहिलेल्या महिलांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत आठवडाभर बाहेर जाण्याचे प्लॅन्स केले. ‘झिम्मा’ सर्वांनाच खूप जवळचा वाटला. आजही मी कुठे गेल्यावर मला अनेक जणी ‘झिम्मा’ आवडल्याचे आवर्जून सांगतात. अनेकींनी ‘झिम्मा २’ लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन या, अशी मागणीही केली. त्या माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या प्रेमाखातरच मी ‘झिम्मा २’चा निर्णय घेतला आणि आता लवकरच ‘झिम्मा २’ही सीमोल्लंघन करण्यासाठी येणार आहे. या वेळी मजा डबल झाली असून हा चित्रपटही प्रेक्षक तितकाच एन्जॅाय करतील."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT