Bhola Teaser: डोक्यावर भस्म, हातात त्रिशूल; अक्षयच्या 'भोला'चा नवा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला...

चित्रपटातील अजय देवगणचा हटके लूक सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.
Bhola Teaser
Bhola TeaserSaam Tv

Bhola Teaser: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या 'भोला' या चित्रपटाचा नुकताच नवा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील अजय देवगणचा हटके लूक सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. चित्रपटात गेल्या काही दिवसांपूर्वी तब्बूचाही टीझर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा नवा टीझर प्रदर्शित झाला आहे. अजय देवगणच्या या चित्रपटात चाहत्यांना जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे.

Bhola Teaser
Supriya Sule: सुप्रिया सुळेंना 'या' वेबसीरिजची पडली भुरळ, पंकज त्रिपाठींसोबत साधला थेट संवाद...

प्रेक्षकांनी अजय देवगणच्या अनेक चित्रपटांमध्ये आपण अॅक्शन पाहिली आहे. भोलेनाथच्या रुपातील अजय देवगणचा वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. त्याच्या या नव्या लूकने चाहत्यांना चित्रपटाची बरीच ओढ लागली आहे. त्रिशूलसोबत अजय देवगण फुल ऑन अॅक्शन मोडमध्ये आहे. अजयने चित्रपटाचा टीझर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

Bhola Teaser
Suhana Khan Post: सुहाना खानच्या फोटोवर शाहरुख खानची भन्नाट कमेंट, म्हणाला 'तू घरी घालतेस तेच कपडे...'

चित्रपटाचा हा टीझरपाहून चाहतेही भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका युजर म्हणतो, अजय देवगण चित्रपटांचे रिमेक बनवत आहे पण तो ते खूप मस्त पद्धतीने बनवत आहे. तर आणखी एक युजर म्हणतो, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता अजय देवगणचा आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट. यापूर्वीही तब्बूचा चित्रपटातील लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्यात ती एका पोलीसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Bhola Teaser
Pathaan Controversy: 'पठान'चित्रपटावर 'या' राज्यात बंदी, निर्मात्यांनी उचलले महत्वाचे पाऊल...

या चित्रपटाविषयी बोलायचे तर अजय देवगण स्वतः याचे दिग्दर्शनही करत आहे. चित्रपटात त्याच्यासोबत तब्बू दिसणार आहे. दृष्यममधील ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा चाहत्यांना एकत्र दिसणार आहे. यामध्ये दीपक डोबरियाल, शरद केळकर, मकरंद देशपांडे आणि संजय मिश्रा दिसणार आहेत. अजयचा हा चित्रपट साऊथ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com