Suhana Khan Post: सुहाना खानच्या फोटोवर शाहरुख खानची भन्नाट कमेंट, म्हणाला 'तू घरी घालतेस तेच कपडे...'

सुहानाने शेअर केलेल्या फोटोवर चक्क शाहरुख खानने कमेंट केली आहे.
Suhana Khan Instagram Post
Suhana Khan Instagram Post Suhana Khan Photos |Instagram @suhanakhan2

Suhana Khan Instagram Post: बॉलीवूडच्या स्टार किड्स जेव्हा उल्लेख होतो तेव्हा शाहरुख खानच्या मुलांचे नाव आवर्जून घेतले जाते. शाहरुख खानची दोन्ही मुलं मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिकेत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. आर्यनची कॉन्ट्रोव्हर्सी आणि सुहानाचे लूक नेहमीच चर्चेत असतात.

सुहाना लवकरच मोठ्या पडद्यावरही दिसणार आहे. मोठ्या पडद्यावर येण्याआधीच सुहानाची सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग मोठी आहे. दरम्यान, तिने तिच्या चाहत्यांसाठी असा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सिझलिंग दिसत आहे. सुहानाने शेअर केलेल्या तिच्या फोटोवर चक्क शाहरुख खानने(Shahrukh Khan) कमेंट केली आहे. सुहानाच्या वडिलांनी मुलीचे गुपित उघड केले. सुहानाच्या या पोस्टवर शाहरुखने काय कमेंट केली ते पाहूया.

Suhana Khan Instagram Post
Athiya-KL Rahul Wedding:अथिया- केएल राहुलला दिल्या मान्यवरांनी शुभेच्छा, कलाकारांसह क्रिकेट जगतातील दिग्गजांनी केला कमेंटचा वर्षाव...

सुहाना खान नुकतीच तिची आई गौरी खान आणि मैत्रिण शनाया कपूरसोबत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईला गेली होती. या कार्यक्रमादरम्यानचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर आहेत. यावर कमेंट करताना शाहरुख खानने लिहिले की, "खूप सुंदर बाळा, तू घरी घालत असलेल्या पायजमापेक्षा पूर्णपणे वेगळी दिसत आहेस". असे बोलून शाहरुखने आपल्या मुलीचे रहस्य उघड केले आहे आणि तसेच सर्वांना सांगितले आहे की ती पायजामा घालून घरात फिरते.

सुहानाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुहाना ब्लॅक कलरच्या हॉल्टर नेक लाँग ड्रेस आणि पिंक कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सुहानासोबत या फोटोंमध्ये गौरी खान आणि आणि शनाया कपूर देखील दिसत आहे.

सुहाना खानच्या या फोटोंना सोशल मीडियावर खूप लाईक केले जात आहे. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी या फोटोंना लाईक केले आहे. तसेच सुहाना खानची मैत्रिण अनन्या पांडेने देखील कमेंट करत लिहिले आहे की, 'प्रेटी गर्ल सुजी'.

सुहाना खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटातून डेब्यू करणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा तसेच खुशी कपूर देखील दिसणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com