Tejaswini Pandit In Adipurush Instagram @tejaswini_pandit
मनोरंजन बातम्या

Tejaswini Pandit Twitter Blue Tick Removed: ‘कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही...’ म्हणत तेजस्विनी पंडीतने सरकारला झापलं...

Tejaswini Pandit Twitter X Post: अभिनेत्रीचा ट्वीटर (एक्स)वरील ब्लू टिक गेली आहे. अकाऊंट व्हेरिफिकेशन गेल्यानंतर अभिनेत्रीचं ट्वीट चर्चेत आलंय.

Chetan Bodke

Tejaswini Pandit Claims Her Twitter Account Verification Got Removed

आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सौंदर्याची भूरळ घालणाऱ्या तेजस्विनी पंडीतची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काल ट्वीटरच्या माध्यमातून तेजस्विनीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस टोलसंदर्भात बोलताना दिसत आहे. या पोस्टनंतर अभिनेत्रीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर (एक्स)वरील ब्लू टिक काढून टाकण्यासंदर्भात पोस्ट केली आहे. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये आपलं मत मांडलंय.

अभिनेत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही!, माझ्या X (ट्विटर) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक 'आम्हा जनतेची' इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून? X (ट्विटर ) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण ह्या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही.”

“सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे, हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा 'जय हिंद जय महाराष्ट्र'साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे! जय हिंद जय महाराष्ट्र!” असा आशय देत अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताना #महाराष्ट्र #टोलधाड #लोकशाही_धाब्यावर #NoDemocracy #MaharashtraPolitics असे हॅशटॅग वापरत अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली.

राज्यातील टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. या मुद्द्यावरून आता अनेकांनी प्रतिक्रिया देत मनसेला पाठिंबा दिला आहे. मराठमोळी अभिनेत्री तेजस्वीनी पंडितने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तेजस्विनी पंडितने ट्वीटर (एक्स) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्विटच्या माध्यमातून तेजस्वीने टोलवाढीच्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त करत मनसेला पाठिंबा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT