बॉलिवूडची (Bollywood) 'कॉन्ट्रव्हर्सी' क्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या आगामी 'तेजस' चित्रपटामुळे (Tejas Movie) चर्चेत आहे. 'तेजस' चित्रपटाबाबत बरीच चर्चा होत आहे. 'चंद्रमुखी 2' नंतर कंगना पुन्हा नव्या अंदाजात मोठ्या पडद्यावर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंगना रनौतचा 'तेजस' चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटातील तिचा एक डायलॉग चांगलाच चर्चेत आला आहे. कंगना रनौतच्या दमदार डायलॉगने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. या डायलॉगचे क्रेडिट पीएम मोदी यांना दिले जात आहे. एका युजरने कंगनाचा हा व्हिडीओ शेअर करत 'पीएम मोदींना क्रेडिट द्यायला विसरू नका', असे कॅप्शन दिले होते. या युजरला कंगनाने जबरदस्त उत्तर दिलं आहे.
'तेजस' चित्रपटातील कंगना रनौतच्या डायलॉग्स आणि लूकने प्रेक्षकांची मनं जिंकली. कंगना रनौत तिच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच एका चित्रपटात एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ८ ऑक्टोबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता. त्यानंतर या ट्रेलरमधील डायलॉग सर्वत्र चर्चेत आले आहेत. 'तेजस'च्या ट्रेलरमधील कंगना रनौतच्या दमदार लूकने सर्वांची मनं जिंकली. चित्रपटातील नवीन लूक आणि डायलॉगने खळबळ माजवण्याची ही कंगनाची पहिलीच वेळ नाही.
'तेजस' चित्रपटच्या ट्रेलरमधला कंगनाचा एक डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा डायलॉग आहे 'भारताच्या वाट्याला गेला तर भारत त्याला सोडणार नाही.' सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका यूजरने कंगनाला या डायलॉगचे श्रेय पीएम मोदींना देण्याचे सुचवले आहे. एका यूजरने एक्सवर पीएम मोदींचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात पीएम मोदी म्हणतात 'भारत कुणाच्या वाट्याला जात नाही, कुणी वाट्याला गेलं तर त्याला भारत सोडत नाही.' पीएम मोदींचे हे वाक्य आणि कंगना रनौतच्या 'तेजस'चित्रपटातील डायलॉगमध्ये खूपच साम्य आहे. त्यामुळे युजरने या डायलॉगचे श्रेय पीएम मोदींना देण्याचा सल्ला दिला आहे.
युजरच्या या ट्विटला रिट्वीट करत कंगनाने लिहिले की,'क्रेडिट निश्चितच आहे.' यासोबतच कंगनाने हसणारे इमोजी याठिकाणी पोस्ट केले आहेत. या पोस्टवर युजर्सने जबरदस्त कमेंट्स देखील केल्या आहेत. कंगनाचे हे ट्वीट सध्या चर्चेत आला आहे. दरम्यान, कंगना रनौतचा तेजस चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना रनौतसोबत अंशुल चौहान, वरूण मित्रा आणि आशिष विद्यार्थी मुख्य भूमिकेत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.