‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. त्यांची ओळख फक्त देशातच नाही तर जगभरात आहे. आजच्या घडीला त्यांच्या नावाची कायमच चर्चा होत असते. आपल्या २३ वर्षांच्या सिनेकारकिर्दीत एसएस राजामौली यांनी १२ चित्रपट केले आणि ते सर्व हिट ठरले. ‘बाहुबली’, ‘आरआरआर’ आणि ‘मगधीरा’ सारखे चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे एसएस राजामौली आज देशातील सर्वात महागडे दिग्दर्शक आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्या सिनेकारकिर्दिविषयी...
एसएस राजामौली यांचे पूर्ण नाव कोडुरी श्रीशैलम श्री राजामौली असे आहे. त्यांना कुटुंबातूनच कलेचा वारसा लाभला होता. बालपणापासूनच राजामौलींना मनोरंजनाची गोडी असल्यामुळे त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत करियर करण्याचं ठरवलं.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियरच्या महत्वाच्या टप्प्यावर असताना, टीव्ही शोमध्ये सहाय्यक दिग्दर्शक आणि नंतर चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलं. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले होते. कुटुंबाची आर्थिक अवस्था पाहून एसएस राजामौली यांनी वयाच्या २० व्या वर्षी कठोर परिश्रम घेत आपल्या परिवाराचे नशीब बदलले. (Actor)
आपल्या फिल्मी करियरमध्ये दिग्दर्शन, लेखक आणि अभिनेता म्हणून काम करत असताना अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागले होते. २००१ मध्ये राजामौली यांनी ‘स्टुडंट नंबर १’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून डेब्यू केले आणि प्रसिद्धीझोतात आले. एसएस राजामौली यांच्या हिट चित्रपटांच्या यादीत ‘मगधीरा’, ‘यमडोंगा’, ‘आरआरआर’, ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या चित्रपटांचा समावेश आहे. त्यासोबतच या चित्रपटांना आयएमडीबीवर सर्वाधिक रेटिंग आहेत. (Films)
बाहुबली २: द कन्क्लुजन - ८.२
बाहुबली: द बीगिनिंग - ८.०
RRR - ७.८
एगा - ७.७
विक्रमारकुदू - ७.७
मगधीरा - ७.७
छत्रपती - ७.६
मर्यादा रामाना - ७.४
चॅलेंज - ७.४
Simhadri - ७.३
त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दिमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या आतापर्यंत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरघोस जबरदस्त कमाई केली आहे. राजामौलींची एकूण १००० कोटींची संपत्ती असून ते एका चित्रपटासाठी तब्बल २०० कोटींच्या आसपास मानधन आकारतात. त्यांची कायमच महागड्या दिग्दर्शकांमध्ये गणना केली जात असून त्याचं हैद्राबादमध्ये एक अलिशान घर सुद्धा आहे. (Tollywood)
राजामौलींच्या ‘मेड इन इंडिया’ या चित्रपटाची गणेशोत्सवाच्या दिवशी घोषणा करण्यात आली होती. हा एक बायोपिक असून चित्रपटाची कथा दादासाहेब फाळके यांच्या कथेवर आधारित आहे. बायोपिकची निर्मिती त्यांचा मुलगा कार्तिकेय आणि वरुण गुप्ता करत असून नितीन कक्कडने चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. सोशल मीडियाच्या माध्यमातून एसएस राजामौलींनी एक व्हिडीओ शेअर करत चित्रपटाची घोषणा केली. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.