Tejaswini Lonari Wedding saam tv
मनोरंजन बातम्या

Tejaswini Lonari Wedding : "नवरी नी नवऱ्याची स्वारी..."; सरवणकरांचा लेक अडकला लग्न बंधनात; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत आयुष्याची नवीन इनिंग

Tejaswini Lonari-Samadhan Sarvankar Wedding : मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि युवा नेते समाधान सरवणकर नुकतेच लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या शाही विवाह सोहळ्याचे व्हिडीओ पाहा.

Shreya Maskar

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि युवा नेते समाधान सरवणकर लग्न बंधनात अडकले आहेत.

तेजस्विनी आणि समाधान यांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

तेजस्विनी आणि समाधान दोघेही लग्नात खूपच सुंदर दिसत आहेत.

मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) आणि युवा नेते समाधान सरवणकर अखेर लग्न बंधानात अडकले आहेत. त्यांचा शाही विवाह पार पडला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तेजस्विनी लोणारी आता सरवणकरांची सून झाली. तेजस्विनी लोणारीने शिंदेंच्या शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar ) यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

समाधान सरवणकर यांना मोठा राजकीय वारसा आहे. ऑक्टोबर महिन्यात तेजस्विनी लोणारीने समाधान सरवणकर यांच्यासोबत साखरपुडा करून दोघांच्या नात्यांचा खुलासा केला होता. राजश्री मराठीने हळदी तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्न सोहळ्याचे सुंदर व्हिडीओ शेअर केले आहेत. या शाही लग्न सोहळ्याला दोन्ही कुटुंबाचे नातेवाईक, मित्र परिवार, कुटुंबीय, कलाकार मंडळी यांनी उपस्थिती लावली आहे.

लग्नाचा लूक

तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांनी लग्नात पारंपरिक लूक केला आहे. तेजस्विनी लोणारीने लाल रंगाची भरजरी साडी नेसली आहे. तर समाधान यांनी गोल्डन रंगाची शेरवानी परिधान केली आहे. नव्या नवरीचा साज-श्रृंगार आणि थाट लय भारी वाटत आहे. समाधान यांनी तेजस्विनीच्या गळ्यात सुंदर मंगळसूत्र घातले. यांनी सात फेरे घेतले आणि आपल्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. दोघे एकत्र खूपच सुंदर आणि आनंदी दिसत आहेत.

सध्या तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांच्यावर चाहते आणि कलाकार, राजकीय परिवार यांच्याकडून शुभेच्छांचा, प्रेमाचा वर्षाव होत आहेत. तेजस्विनी लोणारी ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका, चित्रपट, नाटक यांमध्ये काम केले आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून तेजस्विनी लोणारीला खूप लोकप्रियता मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: : बीडच्या माजलगाव येथील लाहमेवाडी येथे टायर जाळत रस्ता रोको आंदोलन प्रशासनाचा निषेध

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT