मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.
तेजस्विनी राजकीय कुटुंबाची सून होणार आहे.
तेजस्विनी लोणारीने समाधान सरवणकर यांच्यासोबत साखरपुडा केला आहे.
दिवाळीनंतर लगीन सराईला सुरूवात झाली आहे. नुकतीच 'अप्पी आमची कलेक्टर' मधील मुख्य अभिनेत्री शिवानी नाईकने लोकप्रिय अभिनेता अमित रेखीसोबत साखरपुडा केला आहे. त्यानंतर अजून एका मराठमोळ्या अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) आता राजकीय कुटुंबाची सून होणार आहे.
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आता सरवणकरांची सून होणार आहे. तिने शिंदेंच्या शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar ) यांच्याशी थाटामाटात साखरपुडा केला. लवकरच त्यांच्या लग्नाचा बार उडणार आहे. समाधान सरवणकर यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील सदा सरवणकर यांचं मुंबई अन् महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं नाव आहे. समाधान सरवणकर यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात सक्रिय आहेत. समाधन सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी आयुष्याच्या नव्या इनिंगची लवकरच सुरूवात करणार आहेत.
तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साखरपुड्यासाठी दोघांनीही पारंपरिक लूक केला होता. दोघेही एकत्र खूप छान आणि आनंदी दिसत होते. साखरपुड्याला लोणारी आणि सरवणकर कुटुंबातील सदस्यांनी हजेरी लावली. तसेच दोघांचेही मित्र मंडळी देखील साखरपुड्याला पाहायला मिळाले. सध्या तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांच्यावर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.
तेजस्विनी लोणारीने साखरपुड्याला भरजरी लाल रंगाची साडी नेसली होती. मोकळे केस, सुंदर मेकअप आणि ज्वेलरी, हातात हिरवा चुडा घालून तिने हा लूक पूर्ण केला होता. तर समाधान सरवणकर यांनी गोल्डन-व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघांनी एकमेकांच्या हातात अंगठ्या घातल्या आणि आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.