Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

Tejaswini Pandit : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं शुक्रवारी निधन झाल्यानंतर पुण्यात त्यांच्या अंत्यसंस्काराचा विधी शनिवारी करण्यात आला. यावेळी त्यांची मुलगी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आईला मुखाग्नी दिला.
Tejaswini Pandit
Tejaswini PanditSaam Tv
Published On

Tejaswini Pandit : मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकाविश्वातील लोकप्रिय नाव असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं शुक्रवारी १६ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वात शोककळा पसरली.

अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण

त्यांचा अंत्यविधी शनिवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पुण्यातील नवपेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये करण्यात आला. या वेळी अनेक मनसे प्रमुख राज ठाकरेंसह अनेक मान्यवर, कलाकार, कुटुंबीय आणि चाहत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tejaswini Pandit
Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट
Tejaswini Pandit
Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

तेजस्विनी पंडितचा भावनिक क्षण

ज्योती चांदेकर यांच्या मुली आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी आईचे अंतिम संस्कार स्वतः पार पाडले. मुखाग्नी देतानाचा तो क्षण उपस्थितांसाठी हृदय हेलावून टाकणारा ठरला. तेजस्विनीने पूर्ण धैर्य एकवटून अंत्यसंस्कार विधी केला, मात्र आईला मुखाग्नी देतानाचा तिच्या अश्रूंचा बांध फुटला आणि ढसाढसा रडू लागली. त्या क्षणी तिच्यासोबत उपस्थित असलेले अनेक कलाकार आणि नातेवाईकांनाही अश्रू अनावर झाले.

कलाकारांचा ओघ

मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीत ज्योती चांदेकर यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. त्यामुळे अंत्यविधीला अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि सहकारी जमले होते. काहींनी थेट पुण्यात येऊन श्रद्धांजली वाहिली तर काहींनी सोशल मीडियावरून त्यांना आदरांजली अर्पण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com