Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

Tejswini Pandit On Mother jyoti chandekar: मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी १६ ऑगस्ट २०२५ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला.
Tejswini Pandit On Mother jyoti chandekar
Tejswini Pandit On Mother jyoti chandekarSaam Tv
Published On

Tejswini Pandit On Mother jyoti chandekar: मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी १६ ऑगस्ट २०२५ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन अल्पशा आजाराने झाले आहे. आज रविवारी ११ वाजता पुण्यातील नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी आणि मालिकाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

ज्योती चांदेकर यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून लक्षवेधी भूमिका केल्या होत्या. त्यांचे साधे, मनमोकळे व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करून होते. त्या सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेतील पूर्णा आजीच्या भूमिका साकारत होत्या त्यांच्या या कामाचे चाहत्यांनी भरभरुन कौतुक केले.

Tejswini Pandit On Mother jyoti chandekar
Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

त्यांच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. आईच्या आठवणी सांगताना तिने लिहिले की, “मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आई आता सोडून गेली आहे. अल्प आजारानं तिचं दु:खद निधन झालं आहे.”

Tejswini Pandit On Mother jyoti chandekar
Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

ज्योती चांदेकर यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पुण्यातील नवपेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे करण्यात आली. त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वात शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com