Tejaswini Lonari Video  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tejaswini Lonari Video : तेजस्विनी लोणारीची लगीनघाई! थाटात पार पडला मेहंदी सोहळा, होणार राजकीय कुटुंबाची सून

Tejaswini Lonari Mehndi Ceremony : मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. नुकताच मेहंदी सोहळा पार पडला आहे.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे.

नुकताच तेजस्विनीचा मेहंदी सोहळा पार पडला आहे.

तेजस्विनी लोणारी समाधान सरवणकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे.

सध्या मनोरंजनसृष्टीत लगीनघाई पाहायला मिळत आहे. एका पाठोपाठ एक कलाकार बोहल्यावर चढताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नानंतर सध्या तीन अभिनेत्रीची लग्न पाहायला मिळत आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आज लग्नबंधनात अडकणार आहे. तर पूजा बिरारी आणि सोहम बांदेकरचा नुकताच हळदी समारंभ पार पडला आहे. अशात आत अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या (Tejaswini Lonari ) घरीही लगीनघाई पाहायला मिळत आहे. लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकताच तिचा मेहंदी समारंभ पार पडला आहे.

तेजस्विनी लोणारीच्या मेहंदी समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तेजस्विनी लोणारी सरवणकरांची सून होणार आहे. ती शिंदेंच्या शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar ) यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. समाधान सरवणकर यांना मोठा राजकीय वारसा आहे. समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी आयुष्याच्या नव्या इनिंगची लवकरच सुरूवात करणार आहेत.

मेहंदी सोहळा

तेजस्विनी लोणारीने मेहंदी सोहळ्याला जांभळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि ज्वेलरीमध्ये तिचे सौंदर्य खुललं होते. तिने हाता-पायावर सुंदर मेहंदी काढली आहे. तेजस्विनीच्या हातावर समाधान सरवणकर यांच्या नावाची मेहंदी लागली आहे. मेहंदी सोहळ्यात सुंदर फुलांची डेकोरेशन पाहायला मिळत आहे. चाहते आणि कलाकार तेजस्विनीला तिच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

तेजस्विनी लोणारीला 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. तिने मालिकांमध्ये, चित्रपटात, नाटकात काम केले आहे. तिच्या लग्न सोहळ्याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT