Shruti Vilas Kadam
तेजस्विनी लोणारी अभिनयासोबतच सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिने तिच्या यूट्यूब चॅनलवर "टेम्पल ट्रेल्स" नावाचा मंदिर प्रवास प्रेक्षकांसमोर आणत आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने तिने आपल्या मूळगावी येवला येथील जगदंबा माता मंदिराला भेट दिली. हे मंदिर तिच्यासाठी श्रद्धास्थान आहे.
तेजस्विनी सांगते की, येथील देवी नवसाची असून भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून ओळखली जाते.
नवरात्रीत नऊ रंगांच्या साड्यांमध्ये तिने खास फोटोशूट केलं आहे. यातून उत्सवाची अनोखी ऊर्जा तिने कॅमेऱ्यात कैद केली आहे.
फॅशन आणि लाईफस्टाईलला सणाचा आधुनिक टच देत तेजस्विनीने तिच्या फोटोशूटला वेगळेपण दिलं आहे.
अभिनेत्री असूनही ती आता स्वतःचा कंटेंट निर्माण करत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून तिने निर्मिती विश्वातही पदार्पण केले आहे.
मंदिर प्रवासासोबतच प्रेक्षक आता तिच्या आगामी भूमिका आणि प्रोजेक्ट्सबद्दलही उत्सुक आहेत. लवकरत तेजस्विनी नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येईल.