Sakhi Gokhale Debut Bollywood Industry Saam Tv
मनोरंजन बातम्या

Agni Film : "अग्नी" चित्रपटात मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीही साकारणार प्रमुख भूमिका

Sakhi Gokhale Debut Bollywood Industry : 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम सखी गोखले लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार आहे.

Chetan Bodke

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम सखी गोखले लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये "अग्नी" चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये अनेक मराठी सेलिब्रिटी दिसणार आहेत. जितेंद्र जोशी आणि सई ताम्हणकरसोबतच सखी गोखलेही या चित्रपटामध्ये दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा पोस्टर शेअर केलेला होता. तेव्हापासून चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.

२०२३ प्रमाणेच २०२४ हे वर्षही मराठी कलाकार बॉलिवुड गाजवणार यात काही शंका नाही. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रतीक गांधी, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, देव्येंदू, सयामी खेर आणि सखी गोखलेही दिसणार आहे. सखी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक उत्तम लेखिकाही आहे. ती कायमच इन्स्टाग्रामवर आपल्या नवनव्या फोटोंमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. सखीने आजवर अनेक नाटकात, चित्रपटात आणि मालिकेत काम केलं आहे, आता सखी "अग्नी" मध्ये दिसणार आहे.

चित्रपटाविषयी सखी गोखले म्हणाली, " "अग्नी"चं चित्रीकरण करणं हा माझ्यासाठी खूप छान अनुभव होता. अनेक बड्या कलाकारांच्या सोबतीने मला या चित्रपटात काम करता आले. हा निव्वळ योगायोग होता म्हणून सेटवर आपली जवळची लोकं असल्यासारखं वाटलं. "अग्नी"चे दिग्दर्शक राहुल ढोलाकिया यांच्या सारख्या उत्तम दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी या निमित्ताने मिळाली, हा अनुभव देखील सुंदर होता. "अग्नी"मध्ये माझं सगळ्यात जास्त काम हे दिव्येंदुसोबत आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव भारी होता. एक को- ॲक्टर म्हणून तो कमालीचा कलाकार आहे. प्रतीक गांधी, सई ताम्हणकर आणि जितू दादा यांच्यासोबत एकत्र येऊन काम करतानाचा अनुभव मी शब्दात मांडू शकत नाही. सगळ्यांच्या सोबतीने मी सुद्धा अग्नी साठी तितकीच उत्सुक आहे."

सखी अभिनयाच्या सोबतीने एक उत्तम कलाकार आहे. सखी अभिनेत्री तर आहेच पण ती उत्तम फोटोग्राफर देखील आहे. २०१८ मध्ये तिने आर्ट क्युरेशन मध्ये मास्टर केलं असून अभिनयाच्या सोबतीने सखी स्वतःच्या आवड जपत अनेक काम करताना दिसतेय. आगामी काळात सखी अजून काय काय काम करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT