Prajakta Gaikwad Saam tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Gaikwad: प्राजक्ता साकारणार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची भूमिका; 'भिडेवाडा' चित्रपटाची भव्य घोषणा

Prajakta Gaikwad: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. ऐतिहासिक ‘भिडेवाडा’वर आधारित मराठी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

Prajakta Gaikwad: महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासात मानाचे स्थान असलेला ‘भिडेवाडा’ आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेली ही ऐतिहासिक वास्तू केवळ दगड–मातीची रचना नसून, स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची जिवंत साक्ष आहे. याच प्रेरणादायी वारशावर आधारित ‘भिडेवाडा’ हा सामाजिक आशय असलेला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत असून, महात्मा जोतिराव फुले यांच्या भूमिकेत अभिनेता धीरज जोशी झळकणार आहेत. या भूमिकांची घोषणा होताच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. इतिहासातील या थोर व्यक्तिमत्त्वांना पडद्यावर साकारण्याचे आव्हान प्राजक्ता आणि धीरज समर्थपणे पेलतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिवमुद्रा स्टुडिओज निर्मित आणि राघो फिल्म प्रस्तुत ‘भिडेवाडा’ चित्रपटाचे दिग्दर्शन शिवानी राजेशिर्के आणि अजित शिरोळे यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती जयश्री शिरोळे आणि कावेरी जावळे यांनी केली असून, सुप्रिया शिंदे, वैभव जोशी आणि राजू विटकर हे सहनिर्माते आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, त्यातून चित्रपटाचा सामाजिक आशय स्पष्टपणे अधोरेखित होतो.

भिडेवाडा’ ही केवळ ऐतिहासिक कथा नसून, भूतकाळातील प्रेरणेतून वर्तमानाशी नाळ जोडणारी आहे. या चित्रपटातून एका तरुणीच्या जिद्दीचा, स्वप्नांचा आणि संघर्षाचा प्रवास प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे. स्त्री शिक्षणासाठी झालेल्या संघर्षाची झलक आणि आजच्या समाजातील वास्तव यांची सांगड या कथेत घालण्यात आली आहे.

चित्रपटात माधव अभ्यंकर, वैभव चव्हाण, ऋतुराज वानखेडे, नेहा सोनावणे, सम्राट शिरोळे, प्रदीप कोथमीरे, आनंद पिंपळकर यांच्यासह अनेक अनुभवी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. कथा अजित शिरोळे, पटकथा अजित शिरोळे आणि अक्षय कट्टी, तर संवाद अक्षय कट्टी यांनी लिहिले आहेत. संगीत सागर शिंदे, छायांकन योगेश कोळी आणि संकलन राजेश बारबोले यांचे आहे. इतिहासाची साक्ष आणि वर्तमानातील संघर्ष यांची सांगड घालणारा ‘भिडेवाडा’ हा चित्रपट सामाजिक जाणीवा जागवणारा आणि विचार करायला लावणारा महत्त्वपूर्ण सिनेअनुभव ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT