Nandita Patkar On Mandar Devsthali: मराठी मनोरंजन विश्वात दिग्गर्शक मंदार देवस्थळी यांच्यावरील अभिनेता शशांक केतकर यांच्या पैशांबद्दलच्या आरोपामुळे प्रचंड वाद उफाळला आहे. शशांकने सोशल मीडियावर पोस्ट करून देवस्थळींवर काही कलाकारांचे पैसे न दिल्याचे गंभीर आरोप केले. यामुळे अनेकांनी शशांकची बाजू घेतले तर अनेकांनी मंदारच्या बाजूने आपली प्रतिक्रिया दिली.
याच मुद्द्यावरून अनेक कलाकार आपली प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यातच आता अभिनेत्री नंदिता पाटकर नेही आपले मत स्पष्ट केले आहे. नंदिताने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की तिला आजपर्यंत अशा प्रकारचा अनुभव आला नाही आणि पैशांबाबत उशीर झाला पण शेवटी पैसे मिळाले . पण कोणी मुद्दाम लोकांच्या रोजीरोटीशी खेळ करेल, असं तिला वाटत नाही. कारण तिने मंदार देवस्थळीसोबत काम केलं होतं आणि तो तिचा अनुभव चांगला होता.
नंदिता म्हणाली, सुदैवानं माला अजूनपर्यंत असा अनुभव आलेला नाही. माझ्या काही कामाचे पैसे उशीरा मिळाले पण ते मिळाले. कोणाची बाजू चूक किंवा कोणाची बरोबर हे नाही सांगता येणार पण हे सगळं खरंच खूप त्रासदायक आहे. कारण शेवटी ती रोजी रोटी आहे. मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना मालिका सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनी कामाचे पैसे मिळतात. मी मंदार देवस्थळींकडेही काम केलं आहे. पण माझा अनुभव चांगला होता. तेव्हा असे प्रॉब्लेम्स नाही आला. त्याच प्रोडक्शन होतं. मी त्याच्या मालिकेत काम केलं होतं".
नंदिता पुढे म्हणाली, मंदारसोबत माझी पहिलीच मालिका होती. तसा मला मालिकेचा काहीच अनुभव नव्हता. जसे परेश मोकाशी माझे पहिले सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तसा मालिकेचा पहिला दिग्दर्शक मंदार देवस्थळी. मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. कारण तो अत्यंत क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहे. उठा आणि सीन करा असं तो करत नाही. तो प्रॉपर रिहर्सल करतो. तसे इमोशन्स काढून घेतो. मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं. मुद्दाम कोणी असं करेल असं मला वाटत नाही. एखाद्याचा डाऊनफॉल असू शकतो. पण मला तरी त्याचा चांगला अनुभव आला
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.