Famous Actress  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : एकटीला बोलावलं अन्...; दिग्दर्शकाकडून प्रसिद्ध अभिनेत्रीला घाणेरडी वागणूक, सेटवर नेमकं झालं काय?

Marathi Actress Mentally Harassed By Movie Director : चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाकडून प्रसिद्ध अभिनेत्रीचा मानसिक छळ झाला, तिला घाणेरडी वागणूक मिळाली. अभिनेत्रीने स्वतः धक्कादायक प्रसंग सांगितला.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीचा दिग्दर्शकाकडून मानसिक छळ

स्क्रिप्ट रीडिंगसाठी एकटीला बोलावलं

चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाकडून अभिनेत्रीला घाणेरडी वागणूक

मनोरंजन विश्वात काम करताना सुरुवातीच्या काळात कलाकारांना अनेक चांगले-वाईट अनुभव येत असतात. काही खरंच भयंकर असतात, तर काही अनुभव खूप गोष्टी शिकवून जातात. मराठी टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा असलेला अभिनेत्री मयुरी कापडणेने ही तिला करिअरच्या सुरुवातीला आलेले इंडस्ट्रीतील अनुभव शेअर केले आहे. मयुरी कापडणेने पहिला चित्रपट करतानाचा अनुभव सांगितला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने अभिनेत्रीचा मानसिक छळ केला असल्याचा धक्कादायक खुलासा अभिनेत्रीने केला.

itsmajja शी बोलताना मयुरी म्हणाली की, "पहिल्या चित्रपटात माझे एकाच दिवसात कास्टिंग झाले होते. मी तेव्हा नवीन होते. जास्त अभिनय क्षेत्रातले मला माहित नव्हते. मी ना वर्कशॉप कधी केले, ना कधी एकांकिका केल्या. मी युट्युबवर व्हिडिओ बघून अभिनय शिकले होते. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला माहित होते की, हा माझा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे त्याने मला खूप त्रास दिला. मी घाबरलेही होते..."

पुढे अभिनेत्री म्हणाली की, "चित्रपटाचे पहिले ४-५ दिवस नीट शूटिंग झाले. शूटिंगला माझे बाबा माझ्यासोबत यायचे. तेव्हा दिग्दर्शक म्हणाले, 'बाबांना घरी पाठव...' तेव्हा मी १८-१९ वर्षांचे होते. त्यानंतर पहिले शेड्युल झाले. दुसऱ्या शेड्युलच्या आधी दिग्दर्शकाने मला रीडिंग आहे असे सांगून मुंबईला बोलावले. मी भावासोबत मुंबईला गेले. त्यांनी मला फोन केला, लोकेशन सांगितले आणि विचारले की, 'एकटी असशील ना?' तेव्हा मी त्यांना म्हटले, नाही माझ्यासोबत भाऊ आहे... तेव्हा ते म्हणाले की, 'भावाला कशाला आणलं एकटी यायचे ना...'

शेवटी मयुरीने खुलासा करत म्हणाली की, "मी लोकेशनला पोहचले तिथे कोणच नव्हते. मी खूप घाबरले...त्यानंतर दिग्दर्शक आला, एक पान वाचून घेतले आणि म्हणाला जा आता. त्यानंतर त्याने फोन केला आणि सांगितले की, 'तुला रिप्लेस करतोय...' पण पुन्हा शूटिंगच्या तारखा पाठवल्या. मी घडलेला सर्व प्रकार सह-कलाकारांना सांगितला. त्यांनी मला खूप धीर दिला. त्यानंतर मला 'माझा होशील ना' या मालिकेची ऑफर आली आणि मी ती स्वीकारली. मात्र दुसरीकडे सिनेमाचे शूटिंग सुरूच होते. तेव्हा परत मला दिग्दर्शकाने सुनावले, म्हणाला- 'चित्रपट सुरू असताना तू शो घेतला आहेस, तुझ्यामुळे आमचे शूटिंग होत नाही, मी तुझ्यावर केस करतोय, तुला नुकसान भरपाई द्यावी लागेल...' मग मी चित्रपट मंडळात गेली. माझ्या ओळखीतल्या कलाकारांना घडलेला सर्व प्रकार सांगितला, ते म्हणाले हा मानसिक छळ आहे. मी अखेर शूटिंग पूर्ण केले. मात्र या सर्वामुळे मी काही वेळ ट्रॉमामध्ये होते..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT