Deool Band 2 Collection : स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, वाचा संडे कलेक्शन

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 18 : 'देऊळ बंद 2' चित्रपटाने तिसऱ्या रविवारी देखील बक्कळ कमाई केली आहे. प्रवीण तरडेंचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 18
Deool Band 2 Collectionsaam tv
Published On
Summary

'देऊळ बंद 2' तिसऱ्या रविवारीही हाऊसफुल

'देऊळ बंद 2' चित्रपट २१ मे ला रिलीज

'देऊळ बंद 2' लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा

थिएटरमध्ये सध्या स्वामी भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. तिसऱ्या रविवारी देखील 'देऊळ बंद 2' चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळत आहे. आज चित्रपट रिलीज होऊन 18 दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही सिनेमा पाहायला प्रेक्षक गर्दी करत आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर आणि वेबसाईट्सवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार,'देऊळ बंद २' चित्रपट ९ ते १० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. चित्रपटाने आपले बजेट कधीच वसूल केले आहे. चित्रपटाने आतापर्यंत किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १८

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, १८ व्या दिवशी प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने १,१४९ शोमधून ३.१५ कोटी रुपयांची नेट कमाई केली. यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ७०.२८ कोटी रुपये आणि एकूण नेट कमाई ५९.७५ कोटी रुपये इतकी झाली आहे. चित्रपटाने तिसऱ्या रविवारी देखील बक्कळ कमाई केली आहे. चित्रपट अशीच कमाई करत राहिला तर लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करेल.

  • दिवस १ - ३.०५ कोटी रुपये

  • दिवस २ -३.११ कोटी रुपये

  • दिवस ३ -५.२१ कोटी रुपये

  • दिवस ४ - ६. १० कोटी रुपये

  • दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये

  • दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये

  • दिवस ७ - ३.६० कोटी रुपये

  • दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये

  • दिवस ९ - ३.१० कोटी रुपये

  • दिवस १० - ५ कोटी रुपये

  • दिवस ११ - ५.७५ कोटी रुपये

  • दिवस १२ - २.६० कोटी रुपये

  • दिवस १३ - २.३५ कोटी रुपये

  • दिवस १४ -१.८० कोटी रुपये

  • दिवस १५ -१.८० कोटी रुपये

  • दिवस १६ -१.४० कोटी रुपये

  • दिवस १७ - २.६० कोटी रुपये

  • दिवस १८ - ३.१५ कोटी रुपये

  • एकूण - ५९.७५ कोटी रुपये

'देऊळ बंद -2' चित्रपटाचा मुख्य उद्देश

'देऊळ बंद -2' चित्रपटाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे आहे. आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल करण्याची गरज आहे, असा ठाम संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे. चित्रपटाची कमाई शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असल्याचे प्रवीण तरडेंनी सांगितले.

'देऊळ बंद २' चित्रपटातील कलाकार

  • प्रवीण तरडे

  • स्नेहल तरडे

  • मोहन जोशी

  • महेश मांजरेकर

  • प्रसाद ओक

  • मंगेश देसाई

  • देवेंद्र गायकवाड

  • रमेश परदेशी

  • ओम भूतकर

  • सुनील अभ्यंकर

  • संस्कृती बालगुडे

  • मुकुंद वसुले

  • अतुल कुदले

  • अनिरुद्ध दिंडोरकर

  • हिृषीकेश वांबुरकर

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 18
Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; वयाच्या ३३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत हळहळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com