Siddharth Jadhav Shared On Khalapur Toll Naka Experience Saam Tv
मनोरंजन बातम्या

Siddharth Jadhav Video: राज ठाकरेंनी खालापूर टोलनाका कसा मोकळा केला?; सिद्धार्थ जाधवने व्हिडीओतून सांगितला 'तो' किस्सा

Siddharth Jadhav News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या १०० व्या मराठी नाट्यसंमेलनामध्ये हजेरी लावली होती. नाट्यसंमेलनाहून मुंबईला परतत असताना खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांब रांगा पाहून राज ठाकरे संतापले.

Chetan Bodke

Siddharth Jadhav Shared On Khalapur Toll Naka Experience

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या १०० व्या मराठी नाट्यसंमेलनामध्ये (100th Marathi Natya Sammelan) हजेरी लावली होती. नाट्यसंमेलनाहून मुंबईला परतत असताना खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांब रांगा पाहून राज ठाकरे संतापले.

वाहतुक कोंडी असतानाही टोलवसुली सुरू असल्याचं पाहून राज ठाकरेंनी आपल्या खास अंदाजात टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना खडसावलं. त्यानंतर त्यांनी सर्व गाड्या सोडण्यास सांगितलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावेळी राज ठाकरेंसोबत अभिनेता सिद्धार्थ जाधवही होता. (Social Media)

दरम्यान, त्यावेळचा अनुभव अभिनेत्याने व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ म्हणाला, “नमस्कार मी सिद्धार्थ जाधव. मी माननीय राज ठाकरे यांच्यासोबत पुण्याहून मुंबईपर्यंत एकत्र प्रवास केला. नाट्य संमेलनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मी त्यांच्याबरोबरच प्रवास करत होतो. एक्स्प्रेस हायवेवरून खालापूर टोलनाक्याला येताना वाहनांची लांबच्या लांब रांग पाहिली. साहेब स्वतः गाडी चालवतं होते. मी त्यांच्या गाडीत बसलो होतो. त्यांच्या पोलिस व्हॅनने त्यांच्या कारला रस्ता करून दिला होता. पण ते स्वतः थांबले. आम्हाला काही कळायच्या आत ते गाडीतून उतरले. त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या भाषेत समजावलं. आताच्या आत सगळ्या गाड्या सोडा.” (Marathi Film)

पुढे सिद्धार्थ जाधव म्हणाला, “कारण चार ते पाच किलोमीटर गाड्यांची रांग लागली होती. त्यात कुठेतरी रुग्णवाहिका अडकली होती, लोकं कंटाळली होती. पण साहेबांनी त्यांच्या भाषेत सांगितल्यानंतर लगेच पटापट गाड्या सोडल्या. ती संपूर्ण गर्दी पूर्ण जाईपर्यंत ते तिथेच थांबून राहिले. रुग्णवाहिका जाईपर्यंत ते तिथेच थांबले होते. मग निघताना साहेबांनी सांगितलं, एकही गाडी थांबली नाही पाहिजे. पुढेही त्यांच्याबरोबर प्रवास करताना वाशी टोलनाका असेल किंवा इतर टोलनाक्यांवर थांबून जिथे जिथे वाहतूक कोंडी आहे, तिथे उतरून खडसावून सांगितलं.”

“माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता. सकाळी नाट्य संमेलनात मी त्यांची मुलाखत पाहिली होती. ज्यामध्ये कलाकारांविषयी ते ज्या आत्मीयतेने गोष्टी बोलत होते, तेही भावलं होतं. ते नेहमीच आपल्या कृतीतून सर्वांचे मन जिंकतात. आज घडलेला माझ्यासाठी विलक्षण अनुभव होता. आपण म्हणतो नेहमीच सिनेमामध्ये हिरो असतो. पण राज ठाकरेहे रियल लाईफमधले हिरो आहेत. सॅल्यूट राज साहेब....” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT