Siddharth Chandekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Siddharth Chandekar : सिद्धार्थ चांदेकरची आई झाली बिझनेसवुमन; पुण्यात नवीन दुकान उघडलं, पाहा PHOTOS

Seema Chandekar New Business : मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर यांनी नवीन व्यवसाय सुरु केला आहे. आईचे कौतुक करणारी पोस्ट सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Shreya Maskar

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. अलिकडेच त्याचा 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता सिद्धार्थ एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

सिद्धार्थ चांदेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या पोस्टनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिद्धार्थने त्याच्या आईला पाठिंबा देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थच्या आई सीमा चांदेकर (seema chandekar) या अनेक वेळा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी आपल्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरूवात केली आहे. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर यांनी नवीन व्यवसाय सुरू केला आहे. याची पोस्ट सिद्धार्थने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सिद्धार्थच्या आईने पुण्यात फूड्सचा बिझनेस सुरू केला आहे. सर्व प्रकारचे घरगुती पदार्थ या दुकानत मिळणार आहेत. या दुकानाचे नाव 'सीमा फूड्स' असे ठेवण्यात आले आहे. सिद्धार्थच्या पोस्टमधून दुकानाची पहिली झलक पाहायला मिळत आहे. सिद्धार्थने आईचा दुकानातला एक सुंदर फोटो शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिलं की, "नवीन बिजनेस! नवीन इनिंग! आई मला तुझा खूप अभिमान आहे. पुण्यात आरण्येश्वर चौकात माझ्या आईचं नवं दुकान! सर्व घरगुती गोष्टी...जरूर भेट द्या..."

सिद्धार्थ चांदेकरच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव करून सिद्धार्थच्या आईचे कौतुक आणि त्यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थ चांदेकर कायम आईला पाठिंबा देताना दिसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT