Pune Accident : ते चहा पीत होते पण कारचालकानं...; पुण्यात ड्राईव्हरकडून 'ती' चूक झाली अन् किंमत मात्र विद्यार्थ्यांनी चुकवली, नवी माहिती समोर

Pune Accident News : विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आता घटनास्थळी दाखल झाले आहेत. टपरीवर चहा पिण्यासाठी विद्यार्थी गेले होते. यावेळी एका कारने सर्वांना धडक दिली. या अपघातात १२ विद्यार्थी जखमी झाले आहेत.
Pune Accident
Pune AccidentSaam Tv News
Published On

पुणे : पुण्यातून आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे. सदाशिव पेठेत एका चारचाकी गाडीने १२ तरुणांना उडवल्याची माहिती समोर आळी आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत ही अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. भावे हायस्कूलजवळ कारने १२ जणांना उडवल्याची माहिती समोर आली आहे. हे १२ विद्यार्थी MPSCचे असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्या कारचालकानं या तरुणांना उडवलं त्याची माहिती समोर आली आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आता घटनास्थळी दाखल झाले आहेत. टपरीवर चहा पिण्यासाठी विद्यार्थी गेले होते. यावेळी एका कारने सर्वांना धडक दिली. या अपघातात १२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना संचेती आणि मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पुणे जयराम शिवाजी मुळे असं कारचालकाचं नाव असून तो २७ वर्षांचा आहे. तो समर्थ नगर कॉलनी बिबडेवाडी येथे वास्तव्यास आहे. त्याच्याकडे हुंडई टुरिस्टची गाडी होती. धक्कादायक बाब म्हणजे, तो मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

Pune Accident
Maharashtra Politics : ठाकरे गट अन् मनसे डोंबिवलीत एकत्र, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणाची नांदी?

पुण्यात भावे हायस्कूलजवळ मोठी दुर्घटना घडली. संध्याकाळची वेळ असल्याने अनेक विद्यार्थी हे भावे हायस्कूलजवळ चहा पिण्यासाठी चहाच्या टपरीवर आले होते. यावेळी संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास एक भरधाव कार परिसरात आली. या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोठी अपघाताची घटना घडली. या गाडीने तब्बल १२ जणांना उडवलं. यामध्ये जखमी हे MPSCचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे.

Pune Accident
Weather Update: पश्चिम बंगाल, केरळ ते कर्नाटकपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या पुढील ३-४ दिवसात महाराष्ट्रात कसं असेल हवामान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com