
अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. हे कपल कायमच आपल्या सदाबहार लव्हस्टोरीने चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पण यावेळी मिताली- सिद्धार्थ त्यांच्या लव्हस्टोरीने नाही तर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. सध्या सिद्धार्थ चांदेकर त्याच्या आईमुळे बराच चर्चेत आला आहे. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर ह्यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. सिद्धार्थप्रमाणेच मितालीने देखील आपल्या सासुबाईंच्या लग्नाला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्रीने कौतुक करत खास सासुबाईंसाठी पोस्ट शेअर केली आहे.
आज सकाळी सिद्धार्थने चक्क आईचं दुसरं लग्न करुन दिल्याची पोस्ट शेअर केली होती. सोबतच सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर आईच्या लग्नाचा एक फोटो शेअर करत आईच्या लग्नाबाबत माहिती दिली आहे. आता नुकतंच काही वेळापूर्वी अभिनेत्री आणि सिद्धार्थची बायको मिताली मयेकर- चांदेकरने देखील सासूबाईंसाठी विशेष पोस्ट शेअर केली आहे. Happy married life सासूबाई! म्हणत पोस्ट शेअर केली आहे. यावेळी अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सासूबाईंनी घेतलेल्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. सध्या अभिनेत्रीचीही पोस्ट तुफान चर्चेत आली आहे.
अभिनेत्री मिताली मयेकर आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “Happy married life सासूबाई!
माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते?
खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा. आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.”
तर सिद्धार्थने देखील पोस्ट शेअर केली होती, तो पोस्टमध्ये म्हणाला, “Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married Life...”
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.