Jawan Censor Board Certificate: शाहरुख खानच्या 'जवान'ला कात्री लागणार?; सेन्सॉर बोर्डाने सुचवले मोठे बदल

Jawan Shah Rukh Khan News: जवानला सेन्सॉरच्या कात्रीला सामोरं जावं लागणार आहे.
Jawan Censor Board Certificate
Jawan Censor Board CertificateInstagram @redchilliesent
Published On

Jawan Censor Board Certificate

शाहरुख खान आणि नयनताराचा बहुचर्चित 'जवान' चित्रपटाची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सर्वांनाच चित्रपटाबद्दलची उत्सुकता आहे. प्रकाशझोतात राहिलेल्या जवानला सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीला सामोरं जावं लागत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, जवानला सेन्सॉरच्या कात्रीला सामोरं जावं लागणार आहे.

Jawan Censor Board Certificate
Shabana Azmi News: अभिनेत्री शबाना आझमींनाही ऑनलाईन फसवणुकीचा फटका, पोलिसात तक्रार

अखेर सेन्सॉर बोर्डाकडून 'जवान'ला U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने 7 महत्त्वपूर्ण बदल सुचवत मंजुरी दिली आहे. 'जवान'ची धावण्याची वेळ साधारण 169.18 मिनिटे आहे. U/A प्रमाणपत्राचा अर्थ असा की, सर्व वयोगटातील प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतात. पण हा चित्रपट 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी हा चित्रपट पालकांसोबतच पाहणे आवश्यक आहे. सोबतच सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या निर्मात्यांना जवळपास ७ सीन्सवर कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने अक्षय कुमारच्या 'OMG 2'ला २७ कट्स सुनावले होते. हे कट्स सुनावल्यामुळे निर्माते सेन्सॉर बोर्डवर नाराज झाले होते.

Jawan Censor Board Certificate
Scam 2003–The Telgi Story Trailer: Scam 2003 ची जादू चालणार का? तेलगी स्टोरीचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

शाहरूख खानचा 'जवान' चित्रपट जवळपास १६९. १८ मिनिट अर्थात अडीच तासांचा हा चित्रपट आहे. जवानच्या सेन्सॉर बोर्ड सर्टिफिकेटची प्रिंट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सेन्सॉरने सुचवलेल्या या बदलांमध्ये चित्रपटातील संवाद आणि हिंसक दृश्यांचा समावेश आहे. चित्रपटात दाखवलेल्या या दृश्यांमध्ये शाहरुख खान या चित्रपटाच्या माध्यमातून धमाकेदार पुनरागमन करणार आहे, असे दाखवण्यात आले आहे. आत्महत्येच्या सीनमध्ये बदल सुचवण्यात आला असून चित्रपटाचा एकूण वेळही कमी करण्यात आला आहे.

Jawan Censor Board Certificate
Wedding Photos of Siddharth Chandekar's Mother: अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आईचं लावलं दुसरं लग्न, सोशल मीडियावर लग्नाचे फोटोही केले शेअर

चित्रपटाबद्दल बोलायचे तर, चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन ॲटली यांनी केले असून या चित्रपटात प्रमुख भूमिकेत शाहरुख खान सोबत नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा सोबतच मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक सुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. चित्रपट येत्या ७ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com