Shashank Ketkar Reaction On Ghatkopar Incident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shashank Ketkar Video: कार्यकर्त्यांचे फोटो बघण्यात इंटरेस्ट नाही...घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन अभिनेता शशांक केतकर भडकला

Shashank Ketkar Reaction On Ghatkopar Incident: मराठमोळी अभिनेता शशांक केतकर त्याच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतो. शशांक नेहमी सामाजिक घडामोडींवर आपले मत मांडत असतो. शशांकने नुकतेच घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आपले मत मांडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळी अभिनेता शशांक केतकर त्याच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतो. शशांक नेहमी सामाजिक घडामोडींवर आपले मत मांडत असतो. शशांकने नुकतेच घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आपले मत मांडले आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत राजकीय पक्षांना अने प्रश्न विचारले आहेत.

शशांकने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो म्हणाला की, काल मुंबईतील वादळामुळे १२० फूट १२० फूट मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर पडलं. दुर्दैवाने त्यावेळी पाऊस पडत असल्याने काह जणांची पेट्रोल पंपाखाली आसरा घेतला होता. हा बोर्ड त्यांच्या अंगावर पडला. आणि जे घडू नये ते घडलं. आजचा मृतांचा आकडा १४ आहे. यावर मला कुठल्याच राजकीय पक्षाला किवा राज्यकर्त्याला काहीच म्हणायचं नाही. ही एक नैसर्गित आपत्ती होती. यात कोणाचाही सहभाग नव्हता. आपल्या देशाची लोकसंख्याच इतकी आहे की आपल्या जगण्याची, जीवाची फार किंमतच नाहीये. ही पुन्हा पुन्हा दिसून येतंय. गेल्या काही वर्षात देशात खूप चांगली प्रगती होत आहे, वेगवेगळ्या लेव्हलवर आपण प्रगती करतोय. याचं कौतुकच आहे. परंतु अनेक गोष्टी सुधारणं खूप गरजेचे आहे.

'काल जे घडलं ते नेमकं काय आहे? १२० फूटाचा बोर्ड पडतो? त्यानंतर हा बोर्ड अनधिकृत असल्याचे समजते. या सगळ्यात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षावर आरोप केले जात आहे. त्यानंतर समजलं की, फक्त ४० बाय ४० फूट बोर्ड लावण्याची परवानगी आहे. मग हा बोर्ड उभा राहिलाच कसा? उद्या आणखी चार बोर्ड पडले त्यानंतर समजले की तेदेखील अनधिकृत होते तर काय? एखाद्या फ्लायओवरवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, हे असं कसं असू शकतं. म्हणजे एखादा अपघात झाला तर तुम्ही तो कव्हर कसा करणार? कोण चूक, कोण बरोबर? हे ठरवणार कसं? मी ठाण्यात राहतो. मी रोज मढहून घोडबंदरला डातो. त्या घोडबंदर रोडला चौपाटी तयार होते. हे चांगले नाही. रस्त्यावरील वाहने वाढली आहेत, लोकसंख्या वाढली आहे. मग रस्ते वाढवण्याचे काम पटापट व्हायला नको का? ही जबाबादारी कुणाची? कुणाचं सरकार, कुठली महानगरपालिका याच्याशी मला घेणदेण नाही. ही सत्तेत असलेल्या प्रत्येक व्यक्तीटची जबाबदारी आहे', असं शंशाक म्हणाला.

या व्हिडिओत शंशाकने लहान मुले शाळेत जातात. त्यांच्या सुरक्षिततेचा सवाल उपस्थित केला आहे. शंशाक म्हणाला की, 'मी एका मुलाला बाप आहे. नशीबाने शाळा सुरु नाहीत. जर शालेय मुलांची बस त्या पेट्रोल पंपाखाली उभी असती तर. आणि तो बोर्ड पडला असता तर... किती लहान मुलांचा जीव गेला असता. याला काहीच अर्थ नाहीये. तुमच्या डोक्यात काही शिरतंय का? मी यामागेदेखील व्हिडिओ टाकला होता. ज्यामुळे माझ्या कारचे टायर्स बर्स्ट झाले होते. त्या रस्त्यावर सळई बाहेर निघाल्या होत्या. ती सळई माझ्या चाकात घुसली. कारचं चाक फाटले. आता याचे पैसे कोण देणारे? जर एखादा राजकीय नेत मुलगा बाईकवरुन जात असेल त्याच्या डोक्यावरुन गाडी गेली तर कस वाटेल? राजकारणी लोकांना लाज कशी वाटतं नाही? मी सुजाण नागरिक आहे. मी वोटिंगही केले. पण, प्लीज हे अनधिकृत बोर्डिंग आणि फ्लेक्स काढून टाका'.

'फ्लेक्सवरील मोठेमोठे फोटो आणि त्याखाली कार्यकर्त्यांचे लहान फोटो बघण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. लोकांचे जीव जातात. त्याकडे लक्ष द्या. यावर्षी सरकारमध्ये कोण येईल त्याच्याशी आम्हाला देणघेण नाही. तुमच्या इगोसाठी आमचे जीव घेऊ नका? बोर्डिंग पडल्यामुळे ज्या लोकांचा जीव गेला त्यांचा काय दोष होता. आमचे जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. देश जागतिक पातळीवर नाव कमावतोय. परंतु या मुलभूत गोष्टींमध्ये बदल करण्याची गरज नाहीये का?', असा सवाल त्याने राजकीय पक्षांना विचारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT