मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातलं कोल्ड वॉर आता थेट ओपन वॉरमध्ये बदललंय...दोन्हीही थेट एकमेकांना भिडलेत. अहंकाराच्या लंकेवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद उफाळून आलाय... आणि त्याला कारण ठरलंय पालिका निवडणूक....डहाणूतल्या प्रचारसभेत शिंदेंनी थेट अहंकारी रावणाची लंका जाळण्याचा इशारा दिला....आणि त्याच ठिकाणी प्रचाराला आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जशास तसं उत्तर दिलं.
खरंतर पालघर जिल्ह्यातील 3 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीत भाजप आणि शिंदेसेना आमने-सामने आलीय.. त्यातच 22 नोव्हेंबरला एकनाथ शिंदेंनी पालघरमधूनच भाजपवर हल्लाबोल करत आपल्या नाराजीला प्रथमच उघडपणे वाट मोकळी करुन दिली. मात्र हा शिंदेसेनेचा कोंडमारा सुरु झाला तो भाजपने सुरु केलेल्या ऑपरेशन लोटसमुळे....आधी शिंदेंनी याच मुद्द्यावर अमित शाहांच्या दरबारी तक्रार केली. मात्र त्यातून काहीच हाती न लागल्यानं वारंवार शिंदेंची नाराजी दिसून आलीय..
भाजपच्या ऑपरेशन लोटसविरोधात कॅबिनेटवर बहिष्कार
फडणवीसांनी सुनावल्यानंतर दिल्लीत शाहांची भेट
शाहांकडे फडणवीस, चव्हाणांची तक्रार, मात्र शाहांकडून भाजपाचीच पाठराखण
नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर फडणवीस, अजित पवार एकत्र, शिंदे मात्र एकटेच निघाले
हुतात्मा चौकातही शिंदे-फडणवीसांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं
शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतरही मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमच्यात मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं होतं.. मात्र आता निवडणुकीतील प्रचारसभेतून शिंदे आपल्या नाराजीला मोकळी वाट करून देत आहेत का? अशी चर्चा रंगलीय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.