1280 रुपयांत सरकारी नोकरी? सरकारने नोकरीसाठी वेबसाईट बनवली?

Fact Check: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आता सरकारनेच एक वेबसाईट तयार केलीय...आणि तिथे 1280 रुपयांचा अर्ज भरल्यावर नोकरी मिळते असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच सरकारची अशी कोणती वेबसाईट आहे का?
A fake website claiming to offer government jobs for ₹1280 was exposed during a fact-check investigation.
A fake website claiming to offer government jobs for ₹1280 was exposed during a fact-check investigation.Saam Tv
Published On

सरकारी नोकरी आता 1280 रुपयांत मिळणार असल्याचा दावा केलाय...नोकरी मिळवण्यासाठी काय करावं लागेल...याची माहिती या मेसेजमध्ये देण्यात आलीय...त्यामुळे अनेकांनी वेबसाईटवर जाऊन अर्ज भरलाय...पण, खरंच सरकारी नोकरी 1280 रुपयांत मिळणार आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली.

बेरोजगार तरुण 1280 रुपयांचा अर्ज शुल्क भरून सरकारी नोकरी मिळवू शकतो. एक लिंक देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल.

या मेसेजसोबत http://bmrygovt.in/index/php. ही लिंकही देण्यात आलीय...या लिंकवर एक फॉर्म देण्यात आलाय...फॉर्म भरल्यानंतर 1280 रुपये भरावे लागतात...सर्व माहिती अर्जात भरल्यानंतर सरकारी नोकरी मिळते असा दावा करण्यात आलाय...पण, या मेसेजमध्ये जो दावा करण्यात आलाय ते खरं आहे का...? 1280 रुपये भरून सरकारी नोकरी मिळते का...? कारण, राज्यात बरेच बेरोजगार आहेत...त्यामुळे याची सत्यता जाणून खरी माहिती सांगणं गरजेचं आहे...आमच्या टीमनेही याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला...ही वेबसाईट खरी आहे का...? यावर अर्ज भरल्यानंतर सरकारी नोकरी मिळते का...? हे जाणून घेतलं.

भारतीय मिशन रोजगार योजना ही सरकारची वेबसाईट नाही

सरकारी नोकरी देण्याचा दावा करणारी वेबसाईट बनावट

नोकरीसाठी कोणत्याही वेबसाईटवर अर्ज भरू नका

वेबसाईटवरून पैशांचा व्यवहार करताना एक्सपर्टचा सल्ला घ्या

बनावट साईटच्या माध्यमातून पैशांची फसवणूक होऊ शकते

बऱेच तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत...त्यामुळे अशा वेबसाईट बनवून त्यात लिंक दिली जाते...सरकारी नोकरी आणि तिही 1280 रुपयांत म्हटल्यावर सहज अनेकजण पैसे भरून टाकतात...मात्र, हा फसवणुकीचा डाव आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत 1280 रुपयांत सरकारी नोकरी मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com